Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृती मध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळाचा रेख AB हा व्यास आहे. वर्तुळाची स्पर्शिका PQ वर्तुळाला बिंदू T मध्ये स्पर्श करते. रेख AP ⊥ रेषा PQ आणि रेख BQ ⊥ रेषा PQ. तर सिद्ध करा - रेख CP ≅ रेख CQ.
Advertisements
उत्तर

पक्ष: C हे वर्तुळकेंद्र आहे.
रेख AB हा वर्तुळाचा व्यास आहे.
रेषा PQ ही स्पर्शिका आहे, रेख AP ⊥ रेषा PQ आणि रेख BQ ⊥ रेषा PQ
साध्य: रेख CP ≅ रेख CQ
रचना: रेख CT, रेख CP व रेख CQ काढा.
सिद्धता:
रेषा PQ ही T बिंदूत स्पर्शिका आहे. ..........[पक्ष]
∴ रेख CT ⊥ रेषा PQ .....(i) [स्पर्शिका -त्रिज्या प्रमेय]
तसेच, रेख AP ⊥ रेषा PQ,
रेख BQ ⊥ रेषा PQ ..........[पक्ष]
∴ रेख AP || रेख CT || रेख BQ ....[एकाच रेषेला लंब असणाऱ्या रेषा परस्परांना समांतर असतात.]
∴ `"AC"/"CB" = "PT"/"TQ"` ......[तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म]
परंतु, AC = CB ......[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ `"AC"/"AC" = "PT"/"TQ"`
∴ `"PT"/"TQ" = 1`
∴ PT = TQ ..........(ii)
आता ΔCTP व ΔCTQ मध्ये,
रेख PT ≅ रेख QT ....[(ii) वरून]
∠CTP ≅ ∠CTQ .....[(i) वरून, प्रत्येक कोनाचे माप 90° आहे.]
रेख CT ≅ रेख CT ....[सामाईक बाजू]
∴ ΔCTP ≅ ΔCTQ ......[एकरूपतेची बाकोबा कसोटी]
∴ रेख CP ≅ रेख CQ ......[एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
दिलेल्या आकृतीत, केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या बाह्यभागातील R या बिंदूपासून काढलेले RM आणि RN हे स्पर्शिकाखंड वर्तुळाला बिंदू M आणि N मध्ये स्पर्श करतात. जर OR = 10 सेमी व वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी असेल तर-
(1) प्रत्येक स्पर्शिकाखंडाची लांबी किती?
(2) ∠MRO चे माप किती?
(3) ∠MRN चे माप किती?
त्रिज्या 4.5 सेमी असलेल्या वर्तुळाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत. तर त्या स्पर्शिकांतील अंतर किती हे सकारण लिहा.
सोबतच्या आकृतीत, बिंदू M वर्तुळकेंद्र आणि रेख KL हा स्पर्शिकाखंड आहे. जर MK = 12, KL = `6sqrt3` तर
(1) वर्तुळाची त्रिज्या काढा.
(2) ∠K आणि ∠M यांची मापे ठरवा.

आकृती मध्ये, बिंदू O वर्तुळकेंद्र आणि रेख AB व रेख AC हे स्पर्शिकाखंड आहेत. जर वर्तुळाची त्रिज्या r असेल आणि l(AB) = r असेल, तर `square`ABOC हा चौरस होतो, हे दाखवा.

शेजारील आकृतीत, रेषा l ही केंद्र O असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा त्रिज्या OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q ला सामावणारी जीवा RS || रेषा l. जर RS 12 सेमी असेल, तर वर्तुळाची त्रिज्या काढा.

दिलेल्या आकृतीत, केंद्र D असलेले वर्तुळ ∠ACB च्या बाजूंना बिंदू A आणि B मध्ये स्पर्श करते. जर ∠ACB = 52°, तर ∠ADB चे माप काढा.

आकृतीत रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहेत, तर रेख OR हा ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांचा दुभाजक आहे, हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

सिद्धता:
ΔRMO आणि ΔRNO यांमध्ये,
∠RMO ≅ ∠RNO = 90° ...............[`square`]
कर्ण OR ≅ कर्ण OR …..............[`square`]
बाजू OM ≅ बाजू [`square`] ..........…[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]
∴ ΔRMO ≅ ΔRNO ….......[`square`]
∠MOR ≅ ∠NOR
तसेच, ∠MRO ≅ [`square`] ......................[`square`]
∴ रेख OR ∠MRN आणि ∠MON या दोन्ही कोनांची दुभाजक आहे.
खालील प्रमेय सिद्ध करा:
वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात.
आकृतीमध्ये, O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेषा AQ ही स्पर्शिका आहे. जर OP = 3 आणि m(कंस PM) = 120° असेल, तर AP ची लांबी काढा?

वरील आकृतीत, C केंद्र असलेल्या वर्तुळाला A या बाह्यबिंदूतून AB आणि AD हे स्पर्शिकाखंड काढले आहेत. तर सिद्ध करा:
∠A = `1/2` [m(कंस BYD) - m(कंस BXD)]
