हिंदी

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो; सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो; वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।। - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. उत्तरे लिहा. (२)

1. सुसंगतीचे महत्त्व

  1. ___________
  2. __________

2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)

  1. ___________
  2. ___________

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
सदंघ्रिकमळी दडो; मुरडितां हटानें अडो;
वियोग घडतां रडो; मन भवच्चरित्रीं जडो।।

न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रगट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।

3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)

मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।

4. काव्यसाैंदर्य. (२)

खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.

स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

१.

1. सुसंगतीचे महत्त्व

  1. वाईट विचार, दोष निघून जातात.
  2. ऐहिक सुखोपभोगांचा नेहमी वीट येतो.

2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय.

  1. सदा सज्जनांच्या सहवासात राहावे व त्यांचे चांगले बोल ऐकावेत.
  2. भगवंताच्या नामस्मरणात मनाला गुंतवावे.

3. हे हरि, माझ्या मुखात तुझ्या नामावलीचा सदा वास होवो तिच्यामुळे माझ्या संपूर्ण कामना पूर्ण होतील.

4. प्रस्तुत काव्यपंक्ती कवी मोरोपंतांच्या 'केकावली' या संग्रहातील 'भरतवाक्य' या पद्यरचनेतील आहे. या केकावलीतून कवी मोरोपंत सद्गृहस्थ किंवा सज्जन माणसांच्या संगतीचे व त्यांच्या विचारांच्या सान्निध्याचे महत्त्व सांगू पाहत आहेत.
          ही केकावली म्हणजे कवीने मनाला दिलेली शिकवण आहे. मनाने कधीही निश्चय भंग पावू देऊ नये, भजनापासून ढळू नये असे कवी म्हणतात. दुष्ट लोकांनी निर्माण केलेल्या विघ्नांची बाधा दूर व्हावी, सज्जनांनी सांगितलेल्या मार्गाकडे (भक्तिमार्ग) बुद्धी वळावी असे कवी मनाला आवाहन करत आहे. त्यामुळे, मनाला स्वतत्त्वाची खरी जाणीव होईल. अहंकार, अभिमान गळून जाईल व ते पवित्र होईल. त्या ज्ञानाच्या प्रकाशात सारे अज्ञान, मनाकडून कळत-नकळत घडलेले पाप भस्मसात व्हावे, असा सर्वसमावेशक, उद्बोधक विचार कवी येथे स्पष्ट करतात.

shaalaa.com
भरतवाक्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: भरतवाक्य - कृती क्रमांक १

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 12 भरतवाक्य
कृती क्रमांक १ | Q 2. (अ)

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______ 


खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.

गोष्टी विनंती
(१) निश्चय ______
(२) चित्त ______
(३) दुरभिमान ______
(४) मन ______

खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

मति सदुक्तमार्गीं वळो


‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.


वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.


खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;


खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.

भरतवाक्य

  1. प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा.  (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय.  (१)
  3. कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×