Advertisements
Advertisements
प्रश्न
‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
Advertisements
उत्तर
आशयसौंदर्य : 'केकावली' या काव्य ग्रंथ के समाप्ती करताना उपसंहार म्हणून ही 'भरतवाक्य' काव्यरचना कविश्रेष्ठ मोरोपंतांनी लिहिली आहे. तनामनातील दुर्गुण जाऊन सद्गुण कोणते व कसे अंगिकारावे, याबद्दल देवाकडे आर्त प्रार्थना केली आहे.
काव्यसौंदर्य : 'सुसंगती' म्हणजे चांगल्या, सज्जन व्यक्तीची मैत्री होय, गुणवान व चारित्र्यवान माणसांच्या संगतीत सदैव राहावे, म्हणजे आपली आत्मिक प्रगती व ज्ञानप्राप्ती होते, असा आशय उपरोक्त ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. 'सुजनवाक्य' म्हणजे सुविचारांची धारणा जर केली, तर मन निर्मळ व प्रेमळ होते. असाही सुयोग्य सल्ला मोरोपंतांनी जनसामान्यांना दिला आहे.
भाषिक वैशिष्ट्ये : प्रस्तुत ओळींमध्ये सामान्य माणसांना परमार्थाची आवड लागावी, म्हणून दोन वर्तन-नियम सांगितले आहेत. साधकाने चारित्र्यसंपन्न होण्यासाठी उपदेश केला आहे. प्रत्येक चरणात ११+१३ मात्रेची आवर्तने असणारी हे 'केकावली' नावाचे मात्रावृत्त आहे. यातील भाषा साधी, सोपी व आवाहक असल्यामुळे हृदयाला थेट भिडणारी आहे. 'घडो-जडो' या यमक प्रधान क्रिया पदांमुळे कवितेला सुंदर लय व नाद आला आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______
सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
| गोष्टी | विनंती |
| (१) निश्चय | ______ |
| (२) चित्त | ______ |
| (३) दुरभिमान | ______ |
| (४) मन | ______ |
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मति सदुक्तमार्गीं वळो
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
न निश्चय कधीं ढळो
‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा. (२)
1. सुसंगतीचे महत्त्व
- ___________
- __________
2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)
- ___________
- ___________
|
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, |
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)
मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
4. काव्यसाैंदर्य. (२)
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा. (२)
1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी
- ___________
- __________
2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने (२)
- ___________
- ___________
|
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, |
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)
न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
4. काव्यसाैंदर्य. (२)
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे भावसाैंदर्य स्पष्ट करा.
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
