Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा झडो; विषय सर्वथा नावडो;
Advertisements
उत्तर
आशयसौंदर्य: प्रस्तुत ओळ कवी मोरोपंतांच्या ‘केकावली’ संग्रहातील ‘भरतवाक्य’ या पद्यरचनेतील आहे. प्रस्तुत केकावलीतून कवी मोरोपंत सज्जन माणसांच्या संगतीचे व चांगल्या विचारांच्या श्रवणाचे महत्त्व सांगू पाहत आहेत. आपल्या मनाला कायम सज्जनांची संगत लाभो, चांगले विचार सतत आपल्या कानावर पडत राहोत. बुद्धीवरील गंज, वाईट विचार, दोष निघून जावेत. ऐहिक सुखोपभोगांचा नेहमीच वीट यावा, असा उपदेश कवी प्रस्तुत काव्यपंक्तींद्वारे करत आहेत.
काव्यसौंदर्य: मोरोपंतांच्या केकावलीची भाषा संस्कृतप्रचुर, अलंकारयुक्त मराठी शब्दांनी सजलेली आहे. पंडिती काव्याचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य तिच्यात आढळते. उदा. सुसंगती, सुजनवाक्य यांसारखे संस्कृतप्रचुर शब्द कवीने कवितेत ठिकठिकाणी पेरले आहेत. घडो-पडो-झडो-नावडो या शब्दांद्वारे यमक अलंकार साधल्यामुळे या काव्यपंक्तीला एक गेयता प्राप्त झाली आहे. यात पृथ्वीवृत्त वापरले गेले आहे. श्लोकांसारखी ओघवती, रसपूर्ण, प्रासादयुक्त भाषा वापरल्यामुळे कविता श्रवणीय वाटते.
भाषिक वैशिष्ट्ये: ‘केका’ म्हणजे मोराचा टाहो आणि ‘आवली’ म्हणजे पंक्ती. मोरोपंतांनी स्वत:स ‘मोर’ कल्पून, ईश्वराच्या केलेल्या आळवणीला ‘केकावली’ असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे नाटकात शेवटी भरतवाक्य म्हटले जाते त्याचप्रमाणे केकावलीच्या उपसंहारातील या शेवटच्या पद्यरचनेला ‘भरतवाक्य’ म्हणतात. प्रस्तुत काव्यपंक्ती (भरतवाक्य) सुभाषित म्हणूनही प्रसिद्ध आहे, हेही तिचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

कवींच्या मते मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून ______
सदंघ्रिकमळीं दडो; म्हणजे ______
खालील गोष्टींच्या बाबतीत कवी परमेश्वराजवळ कोणती विनंती करतात ते लिहा.
| गोष्टी | विनंती |
| (१) निश्चय | ______ |
| (२) चित्त | ______ |
| (३) दुरभिमान | ______ |
| (४) मन | ______ |
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
मति सदुक्तमार्गीं वळो
खालील ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
न निश्चय कधीं ढळो
‘सुसंगती सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो;’ या ओळींचे रसग्रहण करा.
‘स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;’ या काव्यपंक्तीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
सत्प्रवृत्त व्यक्तीची तुम्हांला जाणवलेली वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत लिहा.
वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ते लिहा.
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा. (२)
1. सुसंगतीचे महत्त्व
- ___________
- __________
2. वाईट गोष्टींचा मोह टाळण्यासाठी करावयाचे उपाय. (२)
- ___________
- ___________
|
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, |
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)
मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी सकलकामना मावली;।
4. काव्यसाैंदर्य. (२)
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे विचार साैंदर्य स्पष्ट करा.
स्वतत्त्व हृदया कळो; दुरभिमान सारा गळो;
पुन्हां न मन हें मळो; दुरित आत्मबोधें जळो।।
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. उत्तरे लिहा. (२)
1. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करावयाच्या गोष्टी
- ___________
- __________
2. परमेश्वराला उद्देशून वापरलेली संबोधने (२)
- ___________
- ___________
|
सुसंगति सदा घडो; सुजनवाक्य कानीं पडो; न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो; मुखीं हरि! वसो तुझी कुशलधामनामावली, |
3. खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (२)
न निश्चय कधीं ढळो; कुजनविघ्नबाधा टळो;
न चित्त भजनीं चळो; मति सदुक्तमार्गीं वळो;।
4. काव्यसाैंदर्य. (२)
खालील काव्यपंक्तींतून व्यक्त होणारे भावसाैंदर्य स्पष्ट करा.
कृपा करिशि तूं जगत्रयनिवास दासावरी,
तशी प्रकट हे निजाश्रितजनां सदा सांवरी।।
खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
मुखीं हरि! वसो तुझी
कुशलधामनामावली,
क्षणांत पुरवील जी
सकलकामना मावली;।।
