Advertisements
Advertisements
प्रश्न
रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.
Advertisements
उत्तर

कच्ची आकृती
आकृतीत दाखवल्याप्रमाणे,
∴ AB = 7.5 सेमी व BC ही A केंद्र असलेल्या वर्तुळाला बिंदू B वरून काढलेली व वर्तुळाला C वर स्पर्श करणारी स्पर्शिका आहे.
BC = 6 सेमी
∴ AC ही वर्तुळाची त्रिज्या आहे.
∴ ΔABC मध्ये, ∠C = 90° ….....[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]
∴ AB2 = AC2 + CB2 ….................[पायथागोरसचे प्रमेय]
∴ (7.5)2 = AC + 62
∴ AC2 = 56.25 – 36
∴ AC2 = 20.25
∴ AC= 4.5 सेमी
∴ केंद्र A असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 4.5 सेमी आहे.

रचनेच्या पायऱ्या:
- रेख AB = 7.5 सेमी काढा.
- बिंदू A हे केंद्र व त्रिज्या 4.5 सेमी घेऊन वर्तुळ काढा.
- बिंदू B वरून वर्तुळाला बिंदू C वर स्पर्श करणारी स्पर्शिका काढा.
BC = 6 सेमी हे पडताळून पाहा.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
केंद्र P व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा.
2.7 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढा.
वर्तुळावरील दिलेल्या बिंदूतून वर्तुळाला काढता येणाऱ्या स्पर्शिकांची संख्या ______ असते.
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.
वर्तुळकेंद्राचा वापर करून वर्तुळाला वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रमेयाचा उपयोग होतो ?
केंद्र M व त्रिज्या 3.4 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा.
C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. बिंदू B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.
| C केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी घेऊन वर्तुळ काढा. |
| ↓ |
| आरंभबिंदू C असणाऱ्या किरणावर 7.2 सेमी अंतरावर बिंदू B घ्या. |
| ↓ |
| रेख BC चा लंबदुभाजक काढून मध्यबिंदू P मिळवा. |
| ↓ |
| P केंद्र व त्रिज्या CP घेऊन वर्तुळ काढा. दोन्ही वर्तुळांच्या छेदनबिंदूस A व D नाव द्या. |
| ↓ |
| रेषा BA व रेषा BD काढा. |
| ↓ |
|
स्पर्शिकाखंड BA = ______ सेमी स्पर्शिकाखंड BD = ______ सेमी |
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
O केंद्र व त्रिज्या 3 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात वर्तुळाबाहेरील P बिंदूतून 4 सेमी लांबीचा रेख PA हा स्पर्शिकाखंड काढा.
O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70°
∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची लांबी लिहा.
