Advertisements
Advertisements
प्रश्न
रेख AB 6 सेमी व्यास असलेले वर्तुळ काढा. व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
Advertisements
उत्तर
विश्लेषण:
व्यास = 6 सेमी
∴ त्रिज्या = 3 सेमी
`{:(रेख "OA" ⊥ रेषा l),(रेख "OB" ⊥ रेषा "m"):}}` ......…[स्पर्शिका त्रिज्येला लंब असते.]
रेख OA व रेख OB ला अनुक्रमे बिंदू A व B वर लंब असणाऱ्या रेषा या बिंदू A व B वर अपेक्षित स्पर्शिका आहेत.

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:
- O केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
- 6 सेमी लांबीची जीवा AB काढा.
- किरण OA व OB काढा.
- किरण OA ला बिंदू A वर लंब असणारी रेषा l काढा.
- किरण OB ला बिंदू B वर लंब असणारी रेषा m काढा.
रेषा l आणि m या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात.
त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.
व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.
| O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा. |
| ↓ |
| किरण OA काढा. किरण OB काढा. |
| ↓ |
| किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा. |
| ↓ |
| किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा |
3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा.
4 सेमी व 6 सेमी त्रिज्या असलेली व O केंद्र असलेली समकेंद्री वर्तुळे काढा. मोठ्या वर्तुळावरील कोणत्याही एका बिंदूतून लहान वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकाखंडांची लांबी लिहा.
O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा.
C केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.5 सेमी अंतरावरील P बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.
बिंदू P हा रेषा AB पासून 6 सेमी अंतरावर आहे. बिंदू P मधून जाणारे 4 सेमी त्रिज्येचे असे वर्तुळ काढा, की रेषा AB ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.
∠ABC = 60°. ∠ABC चा दुभाजक काढा. कोनदुभाजकावर बिंदू Q असा घ्या, की d(B,Q) = 8 सेमी. Q केंद्र असलेले असे वर्तुळ काढा, की किरण BA व किरण BC ला स्पर्श करेल. वर्तुळाची त्रिज्या व स्पर्शिकाखंडाची लांबी लिहा.
