हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

O केंद्र व 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या छेदिकेवर वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावर बिंदू P व बिंदू P घ्या. बिंदू P व बिंदू Q मधून

Advertisements
Advertisements

प्रश्न

O केंद्र व 3 सेमी त्रिज्या असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रातून जाणाऱ्या छेदिकेवर वर्तुळकेंद्राच्या विरुद्ध बाजूस वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावर बिंदू P व बिंदू P घ्या. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

योग
Advertisements

उत्तर

कच्ची आकृती

रचनेच्या पायऱ्या:

  1. O केंद्र 3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
  2. बिंदू P व बिंदू Q अशाप्रकारे घ्या, की OP = 7 सेमी व OQ = 7 सेमी.
  3. रेख OP चा लंबदुभाजक काढा. तो रेख OP ला बिंदू M मध्ये छेदतो. त्याचप्रमाणे, रेख OQ चा लंबदुभाजक काढा. तो रेख OQ ला बिंदू N मध्ये छेदतो.
  4. बिंदू M हे केंद्र मानून आणि त्रिज्या PM घेऊन वर्तुळाला R बिंदूत छेदणारा कंस काढा. बिंदू N हे केंद्र मानून आणि त्रिज्या NQ घेऊन वर्तुळाला S बिंदूत छेदणारा कंस काढा.
  5. किरण PR आणि QS काढा. किरण PR आणि QS या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत.  
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ४)

संबंधित प्रश्न

वर्तुळाबाहेरील बिंदूतून वर्तुळाला जास्तीत जास्त ______ स्पर्शिका काढता येतात. 


पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा.

वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला ______ स्पर्शिका काढता येतील. 


त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


O केंद्र व त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा. 


O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल. 


O केंद्र व त्रिज्या 2.8 सेमी असलेल्या वर्तुळाला P या बाह्य बिंदूतून वर्तुळाला PA व PB या स्पर्शिका अशा काढा, की ∠APB = 70° 


3.5 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळाला दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या एकमेकींना लंब असतील.


रेख AB = 7.5 सेमी लांबीचा काढा. केंद्र A असलेले वर्तुळ असे काढा, की वर्तुळाला बिंदू B मधून काढलेल्या स्पर्शिकाखंडाची लांबी 6 सेमी असेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×