हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर १

  1. भारतीय संविधानातील कलम ३२४ नुसार एक स्वायत्त यंत्रणा म्हणून निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
  2. भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात. तिघांनाही समान अधिकार असतात.
  3. या आयुक्तांची निवड राष्ट्रपतींकडून होते. प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते.
  4. संसदेच्या आणि विधिमंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निष्पक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते.
  5. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणाला दिलेला नाही. 
  6. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. त्यांनी कठीण व प्रतिकूल परिस्थितीतही निवडणुका घेण्याची जबाबदारी कौशल्याने पार पाडली. 
shaalaa.com

उत्तर २

  1. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३२४ अन्वये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली असून, ही एक स्वायत्त संस्था आहे. 
  2. भारतामध्ये, निवडणूक आयोग हा निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतो. या आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन आयुक्तांचा समावेश असतो. यांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाते.
  3. निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य अबाधित राखणे आणि टिकवून ठेवणे महत्त्वाचे असल्याने, निवडणूक आयुक्तांना कोणत्याही राजकीय कारणास्तव त्यांच्या पदावरून सहजपणे दूर करता येत नाही.
  4. स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते. प्रतिकूल परिस्थितीतही, त्यांनी निवडणूक आयोगाची जबाबदारी अत्यंत कार्यक्षमतेने पार पाडली.
shaalaa.com
निवडणूक आयोगाची कार्य
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.2: निवडणूक प्रक्रिया - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (२)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.2 निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय | Q ५. (२) | पृष्ठ ८१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×