हिंदी

खालील दिलेल्या संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. वसुधैव कुटुंबकम् वृत्ती

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील चौकटीत संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा.

  संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१) वसुधैव कुटुंबकम् वृत्ती  
(२) अक्षरशत्रू कुलूप  
(३) चोर कलेला आश्रय देत नाही  
(४) माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला  
सारिणी
टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  संकल्पना संकल्पनांचा अर्थ
(१) वसुधैव कुटुंबकम् वृत्ती संपूर्ण पृथ्वी आपले एक कुटुंब मानणे, सर्वांना आपलेसे मानणे, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होणे हा या 'वसुधैव कुटुंबकम्'चा अर्थ आहे.
(२) अक्षरशत्रू कुलूप अक्षरी कुलुपामध्ये अक्षरे जमवून कुलूप उघडता येते. ज्या कुलुपांमध्ये अक्षरे नसतात अशा साध्या कुलुपांना अक्षरशत्रू कुलुपे असे म्हटले आहे.
(३) चोर कलेला आश्रय देत नाही कुलुपांचा शौक असणाऱ्या नानांनी चोऱ्यांना वैतागून लोहाराच्या मदतीने स्वत: अनोख्या प्रकारचे कुलूप बनवून घेतले. हे कुलूप किल्लीने लागणारे व हिसड्यासरशी उघडणारे होते. हा निव्वळ मूर्खपणा असूनदेखील नाना मात्र याला आपल्या कलेचा उत्तम नमुना समजत होते. त्यामुळे चोरी होणे साहजिकच होते. मात्र आपली पडती बाजू न स्वीकारता चोरच कलेला आश्रय देत नाहीत, असा आरोप ते चोरांवर करतात.
(४) माझ्या हौशीने मिळकतीचा बचाव केला बंडूनाना व इतर सर्व नाटकाला गेले असता त्यांच्या घरी चोरी झाली; मात्र त्यांचे कुटुंब सर्व दागिने अंगावर घालून नाटकाला गेल्यामुळे दागिने तेवढे बचावले. कुटुंबाच्या हौशीला दोष देणाऱ्या बंडूनानांना यावेळी मात्र कुटुंबाने टोमणा दिला, की माझ्या हौशीनेच मिळकतीचा बचाव केला.
shaalaa.com
गद्य (9th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: कुलूप - स्वाध्याय [पृष्ठ ३९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati Standard 9 Maharashtra State Board
अध्याय 10 कुलूप
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्न

खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

नावाजलेले - 


______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.


योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.

फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.


तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?


खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.


कंसातील सूचनेनुसार बदल करा.

याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)


सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.


तुम्हांला समजलेल्या सखू आजीचे व्यक्तिचित्र रेखाटा.


खालील आकृतिबंध पूर्ण करा.


खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.

कुचकामी- 


पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्‌धतीचा घटनाक्रम लिहा.


सूचनेप्रमाणे कृती करा.

वाळे अडवलेले पक्षी मोकळे सोडले जातात. (अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा.)


चौकट पूर्ण करा.


चूक की बरोबर ते लिहा.

परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.


खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.

लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.


समर्पक उदाहरण लिहा.

खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.


समर्पक उदाहरण लिहा.

लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेलं कष्टाचे काम


‘ॲनी सुलिव्हॅन नसत्या तर ‘हेलन’ घडली नसती’, विधानाची सत्यता पटवून द्या.


खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.

विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही. तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशा दुसरा ठरवणार नाही. तुम्हालाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.

१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.

२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×