हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा. i) मिळालेला फुगा लाल असणे. ii) मिळालेला फुगा निळा असणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर पुढील घटनांची संभाव्यता काढा.

i) मिळालेला फुगा लाल असणे.

ii) मिळालेला फुगा निळा असणे.

योग
Advertisements

उत्तर

समजा, R1, R2 हे दोन लाल फुगे आहेत. B1, B2, B3, हे तीन निळे फुगे आहेत, तर G1, G2, G3, G4 हे चार हिरवे फुगे आहेत. 

नमुना अवकाश,  

S = {R1, R2, B1, B2, B3, G1, G2, G3, G4} 

∴ n(S) = 9

i) समजा, घटना A: प्रणालीला मिळालेला फुगा लाल असणे.

लाल फुग्यांची एकूण संख्या = 2

∴ A = {R1, R2}

∴ n(A) = 2

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S"))`

∴ P(A) = `2/9`

ii) समजा, घटना B: प्रणालीला मिळालेला फुगा निळा असणे.

B = {B1, B2, B3}

∴ n(B) = 3

∴ P(B) = `("n"("B"))/("n"("S")) = 3/9`

∴ P(B) = `1/3`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: संभाव्यता - Q.३ (ब)

संबंधित प्रश्न

पुढील उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक उत्तराचा पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.

दोन फासे फेकले असता नमुना घटकांची संख्या ______ आहे.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.


खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही?


एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व एक गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यांतील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे.


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या विषम असणे.


एका खोक्यात 30 तिकिटे आहेत. प्रत्येक तिकिटावर 1 ते 30 पैकी एकच संख्या लिहिली आहे. त्यांतून कोणतेही एक तिकीट यादृच्छिक पद्धतीने काढले, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

तिकिटावरील संख्या पूर्ण वर्ग असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या ही नैसर्गिक संख्या असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×