Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔABC मध्ये रेख AD ⊥ रेख BC आणि DB = 3CD, तर सिद्ध करा : 2AB2 = 2AC2 + BC2

Advertisements
उत्तर

पक्ष: रेख AD ⊥ रेख BC
DB = 3CD
साध्य: 2AB2 = 2AC2 + BC2
सिद्धता:
DB = 3CD ...(i) [पक्ष]
ΔADB मध्ये, ∠ADB = 90° ....[पक्ष]
∴ AB2 = AD2 + DB2 ....[पायथागोरसचे प्रमेय]
∴ AB2 = AD2 + (3CD)2 ........[(i) वरून]
∴ AB2 = AD2 + 9CD2 ...(ii)
AB2 – 9CD2 = AC2 – CD2
ΔADC मध्ये, ∠ADC = 90° ....[पक्ष]
∴ AC2 = AD2 + CD2 ...[पायथागोरसचे प्रमेय]
∴ AD2 = AC2 – CD2 ....(iii)
AB2 = AC2 – CD2 + 9CD2 ....[(ii) व (iii) वरून]
∴ AB2 = AC2 + 8CD2 ...(iv)
CD + DB = BC ....[C - D - B]
∴ CD + 3CD = BC .....[(i) वरून]
∴ 4CD = BC
∴ CD = `"BC"/4` ...(v)
AB2 = AC2 + 8`("BC"/4)^2` .....[(iv) व (v) वरून]
∴ AB2 = AC2 + `8 xx ("BC"^2)/16`
∴ AB2 = AC2 + `("BC"^2)/2`
∴ 2AB2 = 2AC2 + BC2 .....[दोन्ही बाजूंना 2 ने गुणून]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका चौरसाचा कर्ण 10 सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा.
एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे तर त्या आयताच्या कर्णाची लांबी काढा.
आकृती मध्ये M हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. ∠PRQ = 90° असेल तर सिद्ध करा, PQ2 = 4PM2 - 3PR2

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज 169 असेल, तर त्याच्या कर्णाची लांबी किती?
एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा.
ΔABC मध्ये ∠BAC = 90°, रेख BL व रेख CM या ΔABC च्या मध्यगा आहेत, तर सिद्ध करा : 4(BL2 + CM2 ) = 5BC2.

समलंब चौकोन ABCD मध्ये, रेख AB || रेख DC रेख BD ⊥ रेख AD, रेख AC ⊥ रेख BC, जर AD = 15, BC = 15 आणि AB = 25 असेल तर A(`square`ABCD) किती?

पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
एका आयताची एक बाजू 12 आणि कर्णाची लांबी 20 असेल, तर त्या आयताच्या दुसऱ्या बाजूची लांबी किती?
एका काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाची लांबी 25 सेमी व उंची 7 सेमी असेल, तर त्याच्या पायाची लांबी काढा.
सोबतच्या आकृतीत, ∆ABC मध्ये, AD ⊥ BC, तर AB2 + CD2 = BD2 + AC2 हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

कृती: पायथागोरसच्या प्रमेयानुसार, काटकोन त्रिकोण ∆ADC मध्ये,
AC2 = AD2 + `square^2`
∴ AD2 = AC2 – CD2 …...........(i)
तसेच, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, काटकोन त्रिकोण ∆ABD मध्ये,
AB2 = `square^2` + BD2
∴ AD2 = AB2 – BD2 …...… (ii)
∴ `square^2 - "BD"^2 = "AC"^2 - square^2` .....…….. (i) व (ii) वरून
∴ AB2 + CD2 = AC2 + BD2
