Advertisements
Advertisements
प्रश्न
आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5 आहे. आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते. तर आभा आणि तिची आई यांची आजची वये काढा.
Advertisements
उत्तर
आभा आणि तिची आई यांच्या वयांचे गुणोत्तर 2 : 5
∴ आभाचे आजचे वय आणि आभाच्या आईचे आजचे वय अनुक्रमे 2x वर्षे 5x वर्षे मानू.
∴ आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय = 5x − 2x = 3x वर्षे
आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 वर्षे होते असे दिले आहे.
∴ 3x = 27
∴ x = 9
∴ आभाचे आजचे वय = 2x = 2 × 9 = 18 वर्षे
आभाच्या आईचे आजचे वय = 5x = 5 × 9 = 45 वर्षे
∴ आभा आणि तिची आई यांची आजची वये अनुक्रमे 18 वर्षे व 45 वर्षे आहेत.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
7 मिनिटे 20 सेकंद, 5 मिनिटे 6 सेकंद
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
15 : 25
पुढील गुणोत्तराचे शतमानात रूपांतर करा.
`7/10`
वत्सला व सारा यांची आजची वये अनुक्रमे 14 वर्षे व 10 वर्षे आहेत; किती वर्षांनी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 4 होईल?
पुढील गुणोत्तर काढा.
लांबी 5 सेमी व रुंदी 3.5 सेमी असलेल्या आयताच्या परिमितीचे, क्षेत्रफळाशी असलेले गुणोत्तर.
जतीन, नितीन व मोहसीन यांची वये अनुक्रमे 16, 24 व 36 वर्षे आहेत, तर नितीनच्या वयाचे मोहसीनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते?
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
65, 117
खाली दिलेल्या संख्यांच्या जोडीमधील पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
138, 161
पुढील गुणोत्तराचे शतमान रूपांतर करा.
`22/30`
पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपात लिहा.
17 रुपये, 25 रुपये 60 पैसे
