हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. 120° मापाचा एक कंस PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 

योग
Advertisements

उत्तर

विश्लेषण:

समजा, O हे वर्तुळाचे केंद्र आहे.

येथे, ∠POQ = m(कंस PQ) ....…[लघुकंसाच्या मापाची व्याख्या]

∴ ∠POQ = 120° काढल्यानंतर आपल्याला 120° मापाचा कंस PQ मिळतो.

रेषा l आणि रेषा m या वर्तुळाच्या स्पर्शिका आहेत.

रेषा l ⊥ रेख OP आणि रेषा m ⊥ रेख OQ ...…[स्पर्शिका-त्रिज्या प्रमेय]

∴ स्पर्शिका l व m, मिळवण्याकरता रेख OP व रेख OQ ला अनुक्रमे बिंदू P व Q वर लंब काढा.

रचनेच्या पायऱ्या:

  1. केंद्र O असलेले 4.2 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.
  2. किरण OP व OQ अशाप्रकारे काढा, की ∠POQ = 120°. (बिंदू P व बिंदू Q वर्तुळावर असणे आवश्यक)
  3. किरण OP ला बिंदू P वर लंब असणारी रेषा l काढा.
  4. किरण OQ ला बिंदू Q वर लंब असणारी रेषा m काढा.
    रेषा l आणि m या वर्तुळाच्या अपेक्षित स्पर्शिका आहेत.  
shaalaa.com
दिलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका काढणे: वर्तुळ केंद्राचा उपयोग करून.
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: भौमितिक रचना - Q ३ (ब)

APPEARS IN

संबंधित प्रश्न

त्रिज्या 3 सेमी असलेल्या वर्तुळास त्यावरील P या बिंदूतून स्पर्शिका काढा.


व्यासाच्या अंत्यबिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढण्यासाठी खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा.  

O केंद्र व त्रिज्या 3 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळावर बिंदू A व B घेऊन व्यास AB काढा.
किरण OA काढा. किरण OB काढा.
किरण OA ला बिंदू A मधून लंब रेषा काढा.
किरण OB ला बिंदू B मधून लंब रेषा

O केंद्र व त्रिज्या 3.5 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावरील P बिंदूतून स्पर्शिका काढा. 


O केंद्र व 3.4 त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळामध्ये 5.7 सेमी लांबीची जीवा MN काढा. वर्तुळाला बिंदू M व बिंदू N मधून स्पर्शिका काढा. 


O केंद्र व त्रिज्या 3.6 सेमी असलेले वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7.2 सेमी अंतरावरील B या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4.2 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढा. 


4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून दोन स्पर्शिका अशा काढा, की त्या स्पर्शिकांमधील कोन 60° असेल. 


AB = 6 सेमी, ∠BAQ = 50°. A व B मधून जाणारे वर्तुळ असे काढा, की AQ ही वर्तुळाची स्पर्शिका असेल.


2.5 सेमी त्रिज्येच्या वर्तुळात 5 सेमी लांबीची जीवा AB काढा. वर्तुळावर बिंदू C असा घ्या, की BC = 3 सेमी. ΔABC काढा. A, B व C बिंदूंतून वर्तुळाला स्पर्शिका काढा.


∠ABC = 50°. बिंदू S हा ∠ABC च्या कोनदुभाजकावर कोणताही एक बिंदू घ्या. बिंदू S केंद्र असलेले असे एक वर्तुळ काढा, की ∠ABC च्या भुजांना स्पर्श करेल.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×