English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

SSC (English Medium) 10th Standard - Maharashtra State Board Question Bank Solutions for Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
[object Object]
[object Object]
Subjects
Popular subjects
Topics
Advertisements
Advertisements
Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]
< prev  281 to 300 of 743  next > 

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1. आवाज काढून पिल्लांना मार्ग दाखवणारी - ______
  2. घसरून पाण्यांत धपकन पडणारे - ______

           वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.

           साधारणत: कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ‘ऑऽ वऽ’ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.

२. कृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

उताऱ्याच्या आधारे वाघिणीने घेतलेली पिल्लांची काळजी याबाबत तुम्हाला दिसून आलेले मुद्दे सांगा.

[11] जंगल डायरी
Chapter: [11] जंगल डायरी
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण ______
  2. माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण ______

           याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गाेडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं.

           एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.’’ एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं.

           आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

लेखकांना शैक्षणिक जीवनात मोलाचे साहाय्य करणाऱ्या व्यक्तींबद्दलचे मत स्पष्ट करा.

[8.1] ऊर्जाशक्तीचा जागर
Chapter: [8.1] ऊर्जाशक्तीचा जागर
Concept: undefined >> undefined

Advertisements

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) हिरा विद्वान
(ii) शिल्पकार श्रोतृगण
(iii) विषयतज्ज्ञ खाण
(iv) भाषण प्रबुद्ध
(v) प्रौढ शिल्पकला

 

           मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्‍तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही.

२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)

  1. गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
  2. खाणीतून निघणारे - ______
[19] अपठित गद्य आकलन
Chapter: [19] अपठित गद्य आकलन
Concept: undefined >> undefined

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
  2. भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. गहाण - 
  2. डोईवर - 
  3. झेतभट्टी -
  4. धुंद -

४. काव्या सौंदर्य: (2)

“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”

[5] दोन दिवस (कविता)
Chapter: [5] दोन दिवस (कविता)
Concept: undefined >> undefined

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘औक्षण’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘तुझ्या शौर्यगाथे पुढे।
त्याची केवढीशी शान॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) औक्षण -
(ii) आसव -
(iii) तोफ -
(iv) दीन -
[9] औक्षण (कविता)
Chapter: [9] औक्षण (कविता)
Concept: undefined >> undefined

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -
[16.1] स्वप्न करू साकार (कविता)
Chapter: [16.1] स्वप्न करू साकार (कविता)
Concept: undefined >> undefined

व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.

[16.2] व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
Chapter: [16.2] व्युत्पत्ती कोश (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1. स्टेशनमास्तरांकडे धाव घेणारा - ______
  2. गाडी दीर्घकाळ थांबविण्याचा आदेश देणारे - ______

          निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशनमास्तरांनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाले. निरंजनने नेमकी जागा दाखवली.

          फारच भयंकर! कल्पना करता येणार नाही, असा भयंकर अपघात झाला असता. स्टेशनमास्तरांनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला आणि ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला म्हणून त्याचं कौतुकही झालं; परंतु त्या वेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. तो निराश झाला होता. त्याचा नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. त्याला गुरुजींकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहरांनी त्याचं नाव विचारलं. फोटोही काढला. निरंजन उदास मनाने घरी परतला.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

निरंजनने त्याक्षणी घेतलेल्या निर्णयाबाबत तुमचे मत लिहा.

[15] खरा नागरिक
Chapter: [15] खरा नागरिक
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. का ते लिहा. (2)

  1. पोरांना बसने प्रवास करणे आवडत नाही, कारण ______.
  2. आपल्याला झाडं लावावी लागतील, कारण ______.

        ‘‘मी कॉलेजला जाताना सायकल वापरणार. मला माझे पाय रेखामावशींसारखे चंदेरी हवेत’’, स्नेहल गहिवरून म्हणाली.

        अभिषेक भारावून म्हणाला, ‘‘माझ्या तर कॉलेजसमोरच बसस्टॉप आहे. आजपासून मी बसनंच ये-जा करणार. ठरलं एकदम!’’

        ‘‘खरंय पोरांनो, आजकाल चालणं, सायकल वापरणं विसरूनच गेलोय आपण. अगदी कोपऱ्यावरून भाजी जरी आणायची असली तरी आपण बाईकला किक मारतो आणि पुन्हा व्यायामाकरिता वेगळं मॉर्निंग वॉकचं नाटक करतो. बसनं प्रवास करणं तर आपल्याला कमीपणाचं वाटतं; पण आपल्या पायांना चिकटलेला कार्बन प्रमाणात ठेवण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्ट इज अ मस्ट’’, अभिषेकचे बाबा म्हणाले.

        रेखामावशी सगळ्यांचं बोलणं लक्ष देऊन ऐकत होत्या. बोलता बोलता हलकेच त्यांनी आपल्या पायाचे फरशीवरचे ठसे ओल्या फडक्याने पुसून घेतले.

        ‘‘पाह्यलंत, किती सहजपणे पुसले आपल्या मळलेल्या पायांचे ठसे रेखामावशींनी’’, सुमित म्हणाला.

      ‘‘पण आपल्या पायांचे वातावरणावर उमटलेले ठसे मात्र, आपल्याला इतक्या सहजतेने नाही बरं पुसता येणार. त्या करता आपल्याला झाडं लावावी लागतील... या हिरव्यागर्द झाडांनी आपली काळीकुट्ट पावलं थोडी तरी उजळ होतील’’, सुमित भरभरून बोलत होता. ‘‘हो ना, नाही तर आपण तसेच धावत राहू. मळलेल्या पायांची माणसं बनून!’’ पावडेकाका बोलले आणि त्या निळ्याशार तुकड्यावर चांदणं उमलल्याचा त्यांना भास झाला.

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर आवश्यक आहे. याबाबत तुमचे काय मत आहे.

[7] फूटप्रिन्टस
Chapter: [7] फूटप्रिन्टस
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) दागिने माचल
(ii) गुरु मागे फिरणे
(iii) चोर साडी
(iv) माघारी स्त्री
(v) नऊवारी शिष्य

 

       पण रत्नप्रभा क्षणभर विचलित झाली. ती म्हणाली, “मी नखशिखांत दागिन्यांनी मढून तुमच्या घरी येईन. असे वचन मी माझ्या गुरुजींना दिलं आहे आणि मी दिलेला शब्द नेहमीच पाळते.” पण मी माझ्या गुरुंना भेटून परत येताना हे सर्व दागिने तुम्हाला देईन.

       तिचं उत्तर ऐकून त्या चोराला फार आश्चर्य वाटलं. त्याने तिला जाऊ दिलं, पण तिच्यामागोमाग गुपचूप पाठलाग करत तोही निघाला. आता नक्की काय होणार, हे त्याला बघायचं होतं. रत्नप्रभा गुरुजींच्या घरी जाऊन पोहोचली. तिनं त्यांचा दरवाजा ठोकावला. गुरुजींनी दार उघडलं. दागिन्यांनी मढलेल्या रत्नप्रभेला पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच, पण खेदही वाटला. ते म्हणाले, “मला वाटलं, तू माझं बोलणं विनोद समजून हसण्यावारी नेशील. तुला नाउमेद करण्यासाठी मी आपलं तसं म्हणालो. या एवढ्या संकटांना तोंड देऊन तू इथे येशील, असं मला मुळीच वाटलं नव्हतं. तू घरी जा, पोरी माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तू आपला शब्द पाळणारी स्त्री आहेस.”

       रत्नप्रभा माघारी फिरली, तेवढ्यात तो चोर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. ती त्याला म्हणाली, “मी तुम्हाला हे सगळे दागिने द्यायचं कबूल केलं होतं ना? तुम्ही ते घ्या.”

       त्यावर तो चोर हसून म्हणाला, “तुमच्यासारखी स्त्री सापडणं विरळाच. मला तुमच्याकडून काहीसुद्धा नको. तुमच्यासारखी माणसं काही नेहमी भेटत नसतात.”

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. गुरुकडे जाणारी - ______
  2. रत्नप्रभाचा पाठलाग करणारा - ______
[19] अपठित गद्य आकलन
Chapter: [19] अपठित गद्य आकलन
Concept: undefined >> undefined

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी - ______
  2. चिरकाल टिकणारा आनंद - ______

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी। पांखोवा जेवीं पिलियांसी।

जीवन जैसे कां जीवांसी। तेवीं सर्वांसी मृदुत्व।।

जळ वरिवरी क्षाळी मळ। योगिया सबाह्य करी निर्मळ।

उदक सुखी करी एक वेळ। योगी सर्वकाळ सुखदाता।।

उदकाचें सुख तें किती। सवेंचि क्षणें तृषितें होती।

योगिया दे स्वानंदतृप्ती। सुखासी विकृती पैं नाही।।

उदकाची जे मधुरता। ते रसनेसीचि तत्त्वतां।

योगियांचे गोडपण पाहतां। होय निवविता सर्वेंद्रियां।।

मेघमुखें अध:पतन। उदकाचें देखोनि जाण।

अध:पातें निवती जन। अन्नदान सकळांसी।।

तैसे योगियासी खालुतें येणें। जे इहलोकीं जन्म पावणें।

जन निववी श्रवणकीर्तनें। निजज्ञानें उद्‌धरी।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. उदक -
  2. स्वानंदतृप्ती - 
  3. मृदुत्व - 
  4. इहलोकीं - 

४. काव्यसौंदर्य: (2)

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, या वाक्याचे अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

[2] संतवाणी - (अ) अंकिला मी दास तुझा (आ) योगी सर्वकाळ सुखदाता
Chapter: [2] संतवाणी - (अ) अंकिला मी दास तुझा (आ) योगी सर्वकाळ सुखदाता
Concept: undefined >> undefined

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘हिरवंगार झाडासारखं’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झाडांच्या पानावरून वहीच्या पानावर।
अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) खुडलेल्या -
(ii) पालवी -
(iii) मरगळ -
(iv) मंजुळ -
[13] हिरवंगार झाडासारखं (कविता)
Chapter: [13] हिरवंगार झाडासारखं (कविता)
Concept: undefined >> undefined

टिपा लिहा:

सग्वारो कॅक्टस

[12.2] जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
Chapter: [12.2] जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. कोण ते लिहा. (2)

  1.  इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकवणारी - ______
  2. “आपण ‘साहस कथा’ शिकूया” म्हणणारी - ______
सुश्रुत: तुम्ही सगळे कोण आहात?
कथा: अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझंच दुसरं नाव.
सुश्रुत: आपली ओळख कशी काय?
कथा: आईच्या, आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर-बिरबल अशा गोष्टी ऐकत ऐकत तुम्हांला मला वाचायची सवय लागते ना!
सुश्रुत: होऽऽ आता आठवलं आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा-कासव यांच्या गोष्टी सांगायची.
कथा: बरं का सुश्रुत! आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्ये.
सुश्रुत: तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, ‘‘आपण ‘साहस कथा’ शिकूया.’’
कथा: अगदी बरोबर! परीकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा हे माझेच अनेक प्रकार आहेत. शिवाय नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ललितकलांचा पाया म्हणजे मी. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते किंबहुना उत्तम निवेदनतंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य.
सुश्रुत: तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना-

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)

तुम्हाला आवडलेल्या ललितकलेबद्दल तुमचे मत सांगा.

[10] रंग साहित्याचे
Chapter: [10] रंग साहित्याचे
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. योग्य जोड्या लावा. (2)

  ‘अ’ गट ‘ब’ गट
(i) चंदीपूर चेन्नई
(ii) अण्वस्त्र चाचण्या शिक्षणाची सोय
(iii) अण्णा युनिव्हर्सिटी ओरिसा
(iv) खेड्यापाड्यात जावेद मियाँदाद
(v) लहान पोरगा डॉ. कलाम

 

       त्या भेटीनंतर कधीही चेन्नईला जाण्याचा योग आला, की मी अण्णा युनिव्हर्सिटीत जाऊन त्यांची गाठ घेत असे. ते तेथे अध्यापन करत असत. आम्ही तेव्हा अनेक विषयांवर बोलत असू; परंतु आमच्या बोलण्याचा मुख्य विषय म्हणजे- खेड्यापाड्यामध्ये शिक्षणाची सुविधा कशी पोहोचवायची, हाच असे. श्री. कलाम यांना आपल्या स्वतःच्या शिक्षकांविषयी नितांत आदर आहे, त्यांच्या मनात आपल्या शिक्षकांविषयी कमालीची कृतज्ञता आहे.

       मी एकदा ओरिसाच्या दौऱ्यावर गेले असताना चंदीपूरमध्ये जावेद मियाँदाद नावाच्या एखादा लहानशा कोळ्याच्या पोराकडून आयुष्यातील फार मोठं चिरंतन सत्य शिकले होते. जावेदने मला सांगितले होतं- ‘गंजून वाया जाण्यापेक्षा झिजून जाणं केव्हाही उत्तम.’ या अनुभवाविषयी मी कलाम यांना सांगत होते. कलाम यांनी त्याचे हे उद्गार ताबडतोब एका चिट्ठीवर लिहून घेतले आणि म्हणाले, “केवढा मोठा विचार हा!” ओरिसा हे त्यांचं अत्यंत आवडतं राज्य असल्याचं त्यांनीच मला सांगितलं, अण्वस्त्र चाचण्यांसाठी आयुष्यातील वीस वर्षे ते ओरिसातच राहिले होते.

       “तुम्ही जर ओरिसामध्ये कोणताही समाजकार्याचा उपक्रम हाती घेतलात, तर त्यासाठी मी जरूर येईन,” ते म्हणाले. तुम्ही तिथे बरचं काम करता आणि ओरिसा या राज्याविषयी तुम्हांलासुद्धा पुष्कळ आपुलकी आहे. याची मला कल्पना आहे.

२. एका शब्दात उत्तरे लिहा. (2)

  1. ओरिसा, हे यांचे आवडते राज्य होते - ______
  2. लेखिकेला ओरिसा राज्याविषयी वाटणारी - ______
[19] अपठित गद्य आकलन
Chapter: [19] अपठित गद्य आकलन
Concept: undefined >> undefined

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. शक्तीचीही झडते - ______
  2. चैतन्याचे फिरे - ______

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. बळकट - 
  2. आभाळ -
  3. संपदा -
  4. अपरंपार -

४. काव्यसौंदर्य: (2)

‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

[16.1] स्वप्न करू साकार (कविता)
Chapter: [16.1] स्वप्न करू साकार (कविता)
Concept: undefined >> undefined

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘रंग मजेचे रंग उदयाचे’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी।
रंग मजेचे, रंग उदयाचे॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) ताटवे -
(ii) माजतील -
(iii) आभाळ - 
(iv) रुजतील -
[12.1] रंग मजेचे रंग उदयाचे (कविता)
Chapter: [12.1] रंग मजेचे रंग उदयाचे (कविता)
Concept: undefined >> undefined

‘जगणं कॅक्टसचं’ या पाठाच्या आधारे कॅक्टसच्या प्रकारांची माहिती थोडक्यात लिहा.

[12.2] जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
Chapter: [12.2] जगणं कॅक्टसचं (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) खालील विधाने चूक की बरोबर ते लिहा. (2)

  1. पहाटे चार वाजता शेवटची गाडी इथून जाते.
  2. निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठले.
  3. स्टेशन इथून खूप दूर होतं.
  4. पुलावरचे रूळ चांगल्या स्थितीत होते.

रात्री दोन वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेस कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. आता प्रवाशांनी भरलेली नऊ पन्नासची गाडी येईल. निरंजन एकदम सावध झाला. गाडी आली तर भयंकर अपघात होईल, हे त्याच्या लक्षात आलं. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखांकडचं जेवण सारं विसरला. त्याच्या डोळ्यांसमोर धाड्धाड् आवाज करत येणारी रेल्वेगाडी दिसू लागली. कानठळ्या बसवणारा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या कानांत घुमू लागल्या. स्टेशन इथून खूप दूर होतं. तीन-चार किलोमीटर तिथपर्यंत सांगायला जायचं तर परीक्षा बुडणार होती. मग नापास. भडसावळे गुरुजींची मदत बंद. शिक्षणही बंद. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं; परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. तो स्टेशनात शिरला तेव्हा नऊ पन्नासची गाडी नुकतीच आली होती. आता पाच मिनिटांतच ती सुटणार होती.

निरंजनने धावतच स्टेशनमास्तरांना गाठलं. त्यांना पुलावरच्या खराब झालेल्या रुळांबद्दल सांगितलं; पण ते त्यांना खरंच वाटेना. अखेर निरंजनने आर्जवं केली, की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. मी खोटं बोलत असेन, तर मला पोलिसांच्या ताब्यात द्या.

(2) आकृतिबंध पूर्ण करा. (2)

(3) स्वमत. (3)

तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्यांची गुणवैशिष्ट्ये लिहा.

[15] खरा नागरिक
Chapter: [15] खरा नागरिक
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

(1) चौकटी पूर्ण करा. (2)

  1. मावशींचे राहण्याचे ठिकाण - ______
  2. मावशींना लेकाने दिलेली भेट - ______
  3. झोपडीपुढे लावलेले झाड - ______
  4. निळ्या तुकड्याच्या मधोमध उमटलेली - ______

‘‘मावशी, तुम्ही राहता कुठं?’’

‘‘त्या टेकडीपल्याड’’, मावशी म्हणाल्या.

‘‘इथून किती कि. मी. आहे?’’

‘‘तीन.’’

‘‘तुम्ही कशा आलात इथपर्यंत?’’

           ‘‘गेल्या मयन्यापतूर चालतच येत हुते; पन आता माझ्या लेकानं एक सायकल दिलीया मला. तवा आता सायकलनं येते’’, अशी अजून बरीच माहिती त्यानं भरली. आठवड्यातून सरासरी किती किलोमीटर फिरती होते? ही फिरस्ती तुम्ही कशी करता? आतापर्यंत किती झाडं तुम्ही लावली आहेत?

           रेखामावशी फिरायच्या पायीच, कधीतरी सायकलनं! त्यांच्या इवल्याशा झोपडीपुढंही त्यांनी दोन झाडं लावली होती. त्यांतलं एक लिंबोणीचं होतं; पण एवढी सगळी माहिती सुमित का घेतोय, तेच कुणाला कळेना. रेखामावशी तर फार गडबडून गेल्या. ‘‘आणि आता पाहा, या आहेत रेखामावशींच्या फूटप्रिन्टस...! असं म्हणत त्यानं मोबाईलचं कसलंसं बटन दाबलं आणि स्क्रीनवर पायपुसणीच्या आकाराचा एक निळा चौकोन उमटला, अगदी आभाळाच्या निरभ्र तुकड्यासारखा! सगळे ‘आ’ वासून पाहत होते आणि त्या निळ्या तुकड्याच्या मधोमध दोन पावलं उमटली ... एकदम चंदेरी वर्खात मढलेली आणि खाली इंग्रजीत शब्द उमटले ... ‘सिल्व्हर फूटप्रिन्टस! दि मोस्ट क्लिन फूटप्रिन्टस!!’”

           ‘‘वाऽ पाह्यलंत रेखामावशींचे पाय चंदेरी आहेत.’’

(2) कोण ते लिहा. (2)

  1. रेखामावशींची माहिती घेणारा - ______
  2. चंदेरी पाय असलेल्या - ______

(3) स्वमत. (3)

‘ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम’ तुमच्या शब्दांत लिहा.

[7] फूटप्रिन्टस
Chapter: [7] फूटप्रिन्टस
Concept: undefined >> undefined
< prev  281 to 300 of 743  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Question Bank Solutions
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Algebra
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard English
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard English (Second/Third Language)
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Geography
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Geometry Mathematics 2
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Hindi
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Hindi - Composite [हिंदी - संयुक्त]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard History and Political Science
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Sanskrit (Second Language) [संस्कृत (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Sanskrit - Composite [संस्कृत - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Science and Technology 1
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (English Medium) 10th Standard Science and Technology 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×