Please select a subject first
Advertisements
Advertisements
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृतिबंध पूर्ण करा. (२)

| सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा. पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकांइतकीच परत परत आवडीनं वाचली जायची; पण अभ्यासाचं वही-पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं, की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं. माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई-आत्यांची कुरडया-पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ आणि पन्हं, कधीमधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच खूप गोष्टीची आणि कवितांची नवी पुस्तकं... सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही! आमच्या भल्यामोठ्या वाड्यात पुष्कळ बिऱ्हाडं असली, तरी आख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. सुट्टीची वाट पाहताना माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून मन फुलून येई. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. एक वेगळंच जग तिथे भेटत होतं. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं, न अनुभवलेले प्रसंग, अनोळखी तरीपण आपले वाटणारे. ओळखीचे धागे जुळणारे. न जुळणाऱ्या गोष्टीसुद्धा किती थक्क करणाऱ्या! म्हणजे, जग असंही असतं तर...! मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती. लिहिलेली होती. ते सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं! मला भाषेची ताकद समजत होती. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती, म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेड लावायचा की बस्स! आणखी एक वाट पाहणं होतं पोपटांच्या थव्यांचं. आमच्या घरामागे एक मोठ्ठं उंबराचं झाड होतं. उन्हं तापण्याचे दिवस आले, की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशातरीच पानांचं, गाठीगाठीचं ते झाड तेव्हा पिक्या उंबरांनी आणि राघूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं! मी वाट पाहायचे त्या थव्यांची. त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची. माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची... |
२) कारण लिहा. (२)
- पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा, कारण...
- उन्हाळ्यात लेखिकेच्या घरामागचं झाड सुंदर व्हायचं ...
३) स्वमत कृती- (३)
पुस्तकातून न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसं भेटतात; लेखिकेच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का? कसे ते स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)

| भारताचे अर्धांग जे स्त्रिया; त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल. एका बाजूला या देशाला आपण भारत 'माता' म्हणतो; सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर अज्ञानी ठेवतो, हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी, जपानच्या धर्तीवर इ.स. १९१६ साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ पाच स्त्रियांना दाखल करून स्थापन केले. आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात, महर्षी कर्व्यांनी जगप्रवास करून स्त्रीशिक्षणाचे माहात्म्य सर्वत्र बिंबवले. जगभर स्त्रीशिक्षणाबद्दल सभा केल्या. स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्चविद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते. त्यांत त्यांना दोन कार्ये करावयाची होती. एका टोकावर, स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य व दुसऱ्या टोकावर, तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य! पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्याचे जोखड उखडून टाकावे हे महाकठीण काम होते. गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणार्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती. |
2. उत्तर लिहा. (२)
भारतातील समाजाला चीड आणणारा विरोधाभास
- ______
- ______
3. स्वमत (३)
'स्त्रिया अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल' या विधानातील विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
Advertisements
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) तुलना करा. (२)
| व्यक्तीशी मैत्री | कवितेशी मैत्री |
| पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधीपण, केव्हापण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाट्टेल ते बोलतो. इथे फक्त एक फरक होता. तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री-मध्यरात्रीसुद्धा; पण मला मात्र कधीकधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं-अस्वस्थ होणं-कशातच मन लागेनासं होणं-आई, आत्याची ती बोलणी खाणं! आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उंबराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत, असं उगाच वाटत राहतं. आमची आत्या तेव्हा उरुळीकांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरूळीला सहल जाण्याजोग वाहनांची सोय नव्हती. आत्या सकाळी आठ वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरनं उरुळी. परतताना तसंच, गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी नऊ-साडेनऊसुद्धा व्हायचे. आम्ही भावंडं तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली, की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून, तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होत आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजतं; पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. |
२) ओघतक्ता तयार करा. (२)
लेखिकेच्या आत्याच्या दररोजच्या प्रवासाचा ओघतक्ता तयार करा.
३) स्वमत - (३)
तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या वाट पाहण्याचा तुम्हांला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. उत्तर लिहा. (२)
गणिताचा गुणधर्म: ______
अनाथ बालिकाश्रमाचे नामांतरानंतरचे नाव: ______
| महर्षी कर्वे यांनी 'अनाथ बालिकाश्रमा' ची मुहूर्तमेढ रोवली. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून 'हिंगणे स्त्रीशिक्षण संस्था' असे त्यांनी तिचे नामांतर केले. 'पै पै चा निधी' व 'मुरुड निधी' त्यांनी जमवला. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती, की यांतील पै पै चा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे! कर्व्यांना जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव! कर्वे स्वत: मोटार वापरत नसत. मैलोनगणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वत:चे पैसेसुद्धा ते समाजासाठी वापरतात, हे मात्र समाजाला माहीत होते. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे, आपल्या कमाईतून ते करत. उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वत:च्याच विश्वात वावरतात, अशी कुरबूर, घरच्यांच्या मनांत घर करून राहिली होती. वस्तुत: समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती; पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही! नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला. ते बोलत नसत. विचार करत. विचार पक्का झाला, की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येई, की त्यांच्या चित्तात काय चालले आहे! हे डावपेच नव्हते; उलटपक्षी, बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे, हेच श्रेयस्कर असते! |
2. का ते लिहा. (२)
महर्षी कर्वे यांच्या कार्याविषयी प्रश्न उपस्थित करायला समाज धजावला नाही .....
3. स्वमत (३)
'बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असते' याविषयी तुमचे मत उताऱ्याच्या आधारे लिहा.
Concept: undefined >> undefined
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. आकृती पूर्ण करा. (२)

2. योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा. (२)
खोदणे या शब्दाचा कवितेतील अर्थ म्हणजे ___________
i. विहीर आणखी खोदणे.
ii. जिद्दीने आणखी प्रयत्न करणे.
iii. घरबांधणीसाठी खोदणे.
iv. वृक्षलागवडीसाठी खोदणे.
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी खोटी नसतात नाणी.
4. काव्यसाैंदर्य. (२)
'उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे' या काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) कोष्टक पूर्ण करा. (२)

|
श्रोतीं व्हावें सावधान। आतां सांगतों उत्तम गुण। वाट पुसल्याविण जाऊं नये। फळ ओळखिल्याविण खाऊं नये। जनीं आर्जव तोडूं नये। पापद्रव्य जोडूं नये। तोंडाळासीं भांडों नये। वाचाळासीं तंडों नये। आळसें सुख मानूं नये। चाहाडी मनास आणूं नये। सभेमध्यें लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये। कोणाचा उपकार घेऊं नये। घेतला तरी राखों नये। व्यापकपण सांडूं नये। पराधेन होऊं नये। सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये। अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी। |
२) खालील गोष्टींबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. (२)
| क्र. | गोष्टी | उत्तर | दक्षता |
| i. | आळस | ______ | मानू नये. |
| ii. | परपीडा | ______ | वागू नये. |
| iii. | सत्यमार्ग | ______ | नये. |
| iv. | सभेतील वर्तन | ______ | नये. |
३) खालील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)
सत्यमार्ग सांडूं नये। असत्य पंथें जाऊं नये।
कदा अभिमान घेऊं नये। असत्याचा।
४) खालील काव्यपंक्तींतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)
तोंडाळासी भांडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामीं।
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
मूठ मिटून कशाला
म्हणायचे भरलेली
उघडून ओंजळीत
घ्यावी मनातली तळी
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
भरतवाक्य
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी कृती सोडवा.
उत्तमलक्षण
- प्रस्तुत कवितेच्या कवीचे/ कवयित्रीचे नाव लिहा. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (१)
- कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे लिहा. (२)
Concept: undefined >> undefined
पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (२)
- नकारात्मक विचार करा. - ___________
- जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास कायम ठेवा - _________
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
2. तक्ता पूर्ण करा. (२)
कवयित्रीच्या मते काय करावे व काय करू नये ते लिहा.
| काय करावे. | काय करू नये. |
| 1) | 1) |
| 2) | 2) |
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
अपकीर्ति ते सांडावी। सत्कीर्ति वाडवावी।
विवेकें दृढ धरावी। वाट सत्याची।
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
तू झालास मूक समाजाचा नायक
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
Concept: undefined >> undefined
गिरिजा कीर यांच्या ‘यडबंबू ढब्बू’ या बालकादंबरीतील विनोद तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.
आकाशी झेप घे रे
- प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
- प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
- प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)
Concept: undefined >> undefined
पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
'झरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे
उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे!'
Concept: undefined >> undefined
खालील आकृती पूर्ण करा.

Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुम्हांला मधूशी मैत्री करायला आवडेल का, यावर तुमचा अभिप्राय लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेली कृती सोडवा. (३)
तुमची आई आजारी पडल्यावर तुम्ही कशी काळजी घ्याल, ते तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा. (३)
बालनाटिका
Concept: undefined >> undefined
टिपा लिहा. (३)
साहित्यकृतींचा आस्वाद घेताना विचारात घ्यायचे मुद्दे.
Concept: undefined >> undefined
