Advertisements
Advertisements
Question
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) आकृतिबंध पूर्ण करा: (2)

|
मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्या वेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो. पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बांग देतो. |
(2) एका शब्दात उत्तर लिहा: (2)
- मोराच्या ओरडण्याला म्हणत - ................
- मोराचा आनंदाचा काळ असणारा ऋतू - ................
(3) चौकट पूर्ण करा: (2)
- मोर वावरण्याचा परिसर - ................
- मोर जागा होण्याची वेळ - ................
Advertisements
Solution
(1)

(2)
- मोराच्या ओरडण्याला म्हणतात – बांग
- मोराचा आनंदाचा काळ असणारा ऋतू – वर्षा ऋतू
(3)
- मोर वावरण्याचा परिसर - अर्धा ते दोन किलोमीटर परिसर
- मोर जागा होण्याची वेळ – पहाटे
