मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (1) आकृतिबंध पूर्ण करा: मोराच्या स्वैर विहाराची स्थाने मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

      मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्या वेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो. 

      पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बांग देतो.

(2) एका शब्दात उत्तर लिहा:  (2)

  1. मोराच्या ओरडण्याला म्हणत - ................
  2. मोराचा आनंदाचा काळ असणारा ऋतू - ................

(3) चौकट पूर्ण करा:  (2)

  1. मोर वावरण्याचा परिसर - ................
  2. मोर जागा होण्याची वेळ - ................
आकलन
Advertisements

उत्तर

(1)

(2) 

  1. मोराच्या ओरडण्याला म्हणतात – बांग
  2. मोराचा आनंदाचा काळ असणारा ऋतू – वर्षा ऋतू

(3)

  1. मोर वावरण्याचा परिसर - अर्धा ते दोन किलोमीटर परिसर
  2. मोर जागा होण्याची वेळ – पहाटे
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×