मराठी
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] Board Question Paper 2025-2026 SSC (English Medium) 10th Standard Question Paper Solution

Advertisements
Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] [Board Question Paper]
Marks: 40 Maharashtra State Board
SSC (English Medium)
SSC (Hindi Medium)

Academic Year: 2025-2026
Date & Time: 23rd February 2026, 11:00 am
Duration: 2h
Advertisements

कृतिपत्रिकेसाठी सूचना :-

  1. सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात.
  2. आकृत्या पेननेच काढाव्यात.
  3. उपयोजित लेखनातील प्रश्‍नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच या कृती लिहून घेऊ नयेत.
  4. स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.

विभाग - 1 : गद्य
[6]1. (अ)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा:  (2)

      गोपुरीला केंद्रशाळा का काय होती. तिथे चौथीची परीक्षा होती. मी पास झाले. शाळेत रिझल्ट आणायला गेले, तर वांदिले गुरुजी म्हणाले, “चिंधे, तू पास झालीस. आता चिंधी नावाची चिमणी उडून जाणार.”

      मी तो कागद घेऊन बाहेर पडले; पण पुन्हा वळून वळून शाळेकडे पाहत होते. त्या भिंतीवर चुन्यानं लिहिलेली, ‘युनियादी ग्रामशान्य पिंपरी (मेघे)’, ही अक्षर पुसट पुसट होत होती. त्यावरची शाई आसवांच्या त्या पाण्यात कागदभर पसरत होती. अशी माझी शाळा...

      माझं लग्न झाल्यावर सासरी माझा छळ होण्याची जी कारणं आहेत, त्यांपैकी एक कारण म्हणजे माझी शुद्ध भाषा! दुसरं कारण माझं वाचन! माझ्या सासरी शिक्षणाचा गंधही नव्हता. 

(2) योग्य उत्तर लिहा:  (1)

लेखिकेच्या शाळेचे नाव - ................

(3) स्वमत:  (3)

सिंधुताई सपकाळ यांना शिकण्याची खूप तळमळ होती, पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[6]1. (आ)

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

      मोराचा केकारव वर्षा ऋतूचे आगमन सुचवणारा आहे. ग्रीष्म ऋतू संपता संपता उष्णता असह्य होते. त्या वेळी येणारा वर्षासूचक केकारव शेतकऱ्यांमध्ये नवीन आशेचा संचार करतो. ती लवकरच येणाऱ्या पावसाची पूर्वसूचना असते. वर्षा ऋतू हा आनंदाचा काल आहे. तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी-नाले, ओहोळाचे काठ ही या वेळी मोराच्या स्वैर विहाराची स्थाने असतात. मोर नेहमी आपल्या निवासस्थानापासून अर्धा ते दोन किलोमीटरच्या परिसरात वावरतो. चारा सापडेल त्याप्रमाणे तो फिरतो. तो आपला चारा दिवसाच शोधतो. काळोख पडण्यापूर्वी तो आपल्या जागेवर येऊन पोहोचतो. 

      पहाट होताच मोर जागा होतो. ज्या झाडावर त्याने झोप घेतली असेल तिथूनच बसल्या बसल्या तो बांग देतो.

(2) एका शब्दात उत्तर लिहा:  (2)

  1. मोराच्या ओरडण्याला म्हणत - ................
  2. मोराचा आनंदाचा काळ असणारा ऋतू - ................

(3) चौकट पूर्ण करा:  (2)

  1. मोर वावरण्याचा परिसर - ................
  2. मोर जागा होण्याची वेळ - ................
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - 2 : पद्य
[4]2. (अ)

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

(1) आकृती पूर्ण करा:  (2)

अरे खोप्यामधी खोपा
      सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
      झोका झाडाले टांगला।

पिलं निजले खोप्यात
      जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
      जीव झाडाले टांगला।

खोपा इनला इनला
      जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
      जरा देख रे मानसा।

तिची उलूशीच चोच
      तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
      दोन हात दहा बोटं।

(2) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा:  (2)

तिची उलूशीच चोच
      तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
      दोन हात दहा बोटं।

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]2. (आ)

कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

(1) योग्य पर्याय निवडा:  (2)

  1. तुमचे बाहू स्फुरण पावू दया -
    1. दुसऱ्याला मदत करण्यासाठी.
    2. समाजकार्य करण्यासाठी.
    3. देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
    4. देशातील लोकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी.
  2. कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी करावयाची गोष्ट -
    1. शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन दयावे.
    2. देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.
    3. सत्कार्याला प्रोत्साहन द्यावे.
    4. हातांची उत्सुकता तशीच ठेवावी.

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे॥धृ॥
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे॥१॥
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे॥२॥
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश राेष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे॥३॥

(2) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा:  (2)

‘जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू दया, सदैव अपुली माणुसकीची नाती’

Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग-3 : भाषाभ्यास
व्याकरण घटकांवर आधारित कृती:
[1]3. (अ) (1) (i)

पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

इम्तीयाज, मी तुझ्या पाठीशी आहे.

Concept: undefined - undefined
Chapter:
[1]3. (अ) (1) (ii)

पुढील वाक्याचा काळ ओळखून लिहा:

आता चिंधी नावाची चिमणी उडून जाणार.

Concept: undefined - undefined
Chapter:
[2]3. (अ) (2)

योग्य जोड्या जुळवा:

वाक्प्रचार अर्थ
(i) झुंबड उडणे खूप प्रेम करणे
(ii) जिवापाड प्रेम करणे गर्दी होणे
  गर्जना करणे
Concept: undefined - undefined
Chapter:
शब्दसंपत्ती:
[0.5]3. (आ) (1) (i)

खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.

आकाश - 

Concept: undefined - undefined
Chapter: [16] व्याकरण विभाग
Advertisements
[0.5]3. (आ) (1) (ii)

समानार्थी शब्द लिहा.

संताप - ______

Concept: undefined - undefined
Chapter: [16] व्याकरण विभाग
[1]3. (आ) (2)

पुढील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:

महासागर

Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]3. (आ) (3) (i)

अचूक शब्द ओळखा:

सुरक्षीत/सूरक्षीत/सुरक्षित/सूरक्षित

Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]3. (आ) (3) (ii)

अचूक शब्द ओळखा:

गारहाणी/गाऱ्हाणि/गाऱ्हाणी/ग्राहाणी

Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]3. (आ) (4) (i)

पुढील विरामचिन्हाचे नाव लिहा:

विरामचिन्ह नाव
, ....................
Concept: undefined - undefined
Chapter:
[0.5]3. (आ) (4) (ii)

पुढील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा:

विरामचिन्ह विरामचिन्हाचे नाव
! .............
Concept: undefined - undefined
Chapter:
विभाग - 4 : उपयोजित लेखन
[4]4. (अ) | पत्रलेखन:
खालील निवेदन वाचून पत्रलेखन करा.
[4]4. (अ) (i)

॥ विद्या विनयेन शोभते ॥
आदर्श विद्यालय, लातूर.
हार्दिक अभिनंदन!

आपल्या विद्यालयातील इ. ९वी अ मध्ये
शिकत असलेला विद्यार्थी कु. अनिल जाधव याने
राज्यपातळीवरील निबंधलेखन स्पर्धेत प्रथम
क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे विद्यालयाच्या
वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन!

                 – मुख्याध्यापक
                                    आदर्श विद्यालय, लातूर.

इमेल - [email protected]

विजय/विजया शिंदे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने कु. अनिल जाधव याचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
Advertisements
किंवा
[4]4. (अ) (ii)

॥ विद्या विनयेन शोभते ॥
आदर्श विद्यालय, लातूर.
हार्दिक अभिनंदन!

आपल्या विद्यालयातील इ. ९वी अ मध्ये
शिकत असलेला विद्यार्थी कु. अनिल जाधव याने
राज्यपातळीवरील निबंधलेखन स्पर्धेत प्रथम
क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचे विद्यालयाच्या
वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन!

                 – मुख्याध्यापक
                                    आदर्श विद्यालय, लातूर.

इमेल - [email protected]

विजय/विजया शिंदे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने कु. अनिल जाधव यास वर्गातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येण्याबद्दल विनंती करणारे पत्र लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:
खालीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा:
[4]4. (आ) (1)

खालील उतारा वाचून त्यावर आधारित चार प्रश्न असे तयार करा की ज्यांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात येतील.

प्रश्नांचा जन्म जिज्ञासेतून होतो. जिज्ञासा ही कोणत्याही शोधाची जननी असते. जिज्ञासा ही ज्ञानाची गंगोत्री असते. प्रश्नांच्या माध्यमातून ज्ञान संपादन घडून येते. लहान मुलांच्या मनात तर सदोदित असंख्य प्रश्न उमटत असतात. जिज्ञासेपोटी, कुतूहलापोटी ती सतत प्रश्न विचारीत असतात. प्रश्नांच्या माध्यमातूनच सर्जनशीलता बहरास येत असते. प्रश्न हे केवळ ज्ञानप्राप्तीच करून देतात असे नव्हे तर प्रश्नांमुळेच सर्जनशीलतेची कवाडे उघडली जातात. प्रश्नांमुळेच कोणत्याही गोष्टींची सखोल चिकित्सा केली जाते. मानवी संस्कृतीचा आणि ज्ञानसंपादनाचा सर्जनशील अविष्कार हा प्रश्नार्थक वृत्तीतूनच घडून आला आहे. प्रश्न हे ज्ञानसंपादनासही प्रवृत्त करतात.
Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (आ) (2) | जाहिरातलेखन:

संगणक प्रशिक्षण वर्गाची आकर्षक जाहिरात तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter: [15] उपयोजित लेखन
[4]4. (आ) (3) | बातमीलेखन:

‘जनता विद्यालय, हिंगोली’ या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या विषयावर बातमी तयार करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (आ) (4) | कथालेखन:

खालील मुद्द्यांच्या आधारे कथालेखन करा.

एक ससा व कासव - धावण्याची शर्यत - ससा पुढे जातो - हिरवेगार कुरण - ससा गवत खाऊन झोपी जातो - कासव आपला प्रवास सुरूच ठेवतो - ससा गाढ झोपतो - कासव पुढे निघून जातो - कासव शर्यत जिंकतो - तात्पर्य.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (इ) | लेखनकौशल्य
खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंधलेखन करा:
[4]4. (इ) (1)

खालील विषयावर निबंधलेखन करा.

Concept: undefined - undefined
Chapter:
[4]4. (इ) (2)

चौकटीतील घटकाचे आत्मवृत्त लिहा.

Concept: undefined - undefined
Chapter:

Other Solutions






















Submit Question Paper

Help us maintain new question papers on Shaalaa.com, so we can continue to help students




only jpg, png and pdf files

Maharashtra State Board previous year question papers 10th Standard Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] with solutions 2025 - 2026

     Maharashtra State Board 10th Standard question paper solution is key to score more marks in final exams. Students who have used our past year paper solution have significantly improved in speed and boosted their confidence to solve any question in the examination. Our Maharashtra State Board 10th Standard question paper 2026 serve as a catalyst to prepare for your Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] board examination.
     Previous year Question paper for Maharashtra State Board 10th Standard -2026 is solved by experts. Solved question papers gives you the chance to check yourself after your mock test.
     By referring the question paper Solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)], you can scale your preparation level and work on your weak areas. It will also help the candidates in developing the time-management skills. Practice makes perfect, and there is no better way to practice than to attempt previous year question paper solutions of Maharashtra State Board 10th Standard.

How Maharashtra State Board 10th Standard Question Paper solutions Help Students ?
• Question paper solutions for Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)] will helps students to prepare for exam.
• Question paper with answer will boost students confidence in exam time and also give you an idea About the important questions and topics to be prepared for the board exam.
• For finding solution of question papers no need to refer so multiple sources like textbook or guides.
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×