मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा: (1) योग्य पर्याय निवडा: (i) तुमचे बाहू स्फुरण पावू दया - (a) दुसऱ्याला मदत करण्यासाठी. (b) समाजकार्य करण्यासाठी. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

(1) योग्य पर्याय निवडा:  (2)

  1. तुमचे बाहू स्फुरण पावू दया -
    1. दुसऱ्याला मदत करण्यासाठी.
    2. समाजकार्य करण्यासाठी.
    3. देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
    4. देशातील लोकांना सामर्थ्यशाली बनवण्यासाठी.
  2. कवीच्या मते उत्सुकलेल्या हातांनी करावयाची गोष्ट -
    1. शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन दयावे.
    2. देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.
    3. सत्कार्याला प्रोत्साहन द्यावे.
    4. हातांची उत्सुकता तशीच ठेवावी.

हा देश माझा याचे, भान जरासे राहू द्या रे॥धृ॥
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा, यमुना, शेती, धरती, बागबगीचा माझा
अभिलाषा यांची धरिता, कुणी नजर वाकडी करता
या मरण द्यावया, स्फुरण आपल्या बाहू पावू द्या रे॥१॥
जे हात उत्सुकलेले, दगडांच्या वर्षावाला
रोखा ते, लावा कार्याला, या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात, थांबवा आपुला घात
सामर्थ्य न जावो व्यर्थ, काहिसा अर्थही येऊ द्या रे॥२॥
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणसुकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी, फुंकारे एक तुतारी
संदेश राेष जे, द्वेष मनातील वाहून जाऊ द्या रे॥३॥

(2) दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा:  (2)

‘जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू दया, सदैव अपुली माणुसकीची नाती’

आकलन
Advertisements

उत्तर

(1)

  1. देशाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी.
  2. देशाच्या प्रगतीसाठी कार्य करावे.

(2) जरी आपले धर्म वेगवेगळे असले आणि आपापल्या जाती अनेक असल्या तरी आपण सर्वजण भाऊभावासारखे एकत्र राहावे. आपल्या मनात नेहमी माणुसकीचे नाते जपले पाहिजे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×