मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता १० वी

‘जनता विद्यालय, हिंगोली’ या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या विषयावर बातमी तयार करा. - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘जनता विद्यालय, हिंगोली’ या विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या विषयावर बातमी तयार करा.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

हिंगोली: जनता विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

हिंगोली, १५ ऑक्टोबर (प्रतिनिधी): येथील जनता विद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून १५ ऑक्टोबर रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयातील मुख्याध्यापक अरविंद यां कार्यक्रमा मध्ये वाचनाचे महत्त्व सांगणारी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना दररोज किमान ३० मिनिटे अवांतर वाचन करण्याचे महत्त्व पटवून दिले. वाचन संस्कृती रुजवण्यासाठी विद्यालयात ग्रंथदिंडी, पुस्तकाचे मनोगत स्पर्धा आणि कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

याशिवाय शाळेच्या वाचनालयात नव्याने पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. वाचन प्रेरणा दिनानिमित्त संपूर्ण शाळा वाचनमय झाली होती. कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिक्षकांनी केले.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×