Advertisements
Advertisements
Question
तुमचे मत नोंदवा.
औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला.
Very Long Answer
Advertisements
Solution 1
- आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक कोंडी करणे, यालाच ‘आर्थिक राष्ट्रवाद’ असे म्हणतात.
- औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड, फ्रान्स अशा पुढारलेल्या आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे औद्योगिक उत्पादन वाढले.
- अतिरिक्त उत्पादनाने या राष्ट्रांना नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे व त्याचा सतत पुरवठा चालू ठेवणे भाग पडले.
- कच्चा माल मिळवणे व हक्काच्या बाजारपेठा मिळवणे यांसाठी ही राष्ट्रे साम्राज्य विस्ताराकडे वळली.
- जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांचे शोषण करणे, त्यांच्या व्यापारावर निबंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे या प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला.
- अशा रितीने औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला.
shaalaa.com
Solution 2
- औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला. आर्थिक राष्ट्रवादात आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले.
- स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयातनिर्यातीवर बंदी; इतर राष्ट्रांच्या मालावर जबर जकात आकारणी; परदेशात आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र जेथे वसाहती स्थापन करत असेल, तेथे आपल्याही वसाहती स्थापन करणे; प्रसंगी प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध युद्ध करणे या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादात समावेश होता.
- औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले.
- यातूनच भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळवणे; कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे; त्याचा अविरत पुरवठा चालू ठेवणे; त्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणे; ती गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतींचे शोषण करणे सुरू झाले.
- टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यांमुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला. यातूनच इंग्लंड, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला.
shaalaa.com
औद्योगिक क्रांती
Is there an error in this question or solution?
