English

टिपा लिहा. इतिहासकार

Advertisements
Advertisements

Question

टिपा लिहा.

इतिहासकार

Answer in Brief
Advertisements

Solution

इतिहासकार:

१. इतिहासातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहासलेखन असे म्हणतात. इतिहासातील घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार म्हटले जाते. 

२. भूतकाळातील उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सकपणे संशोधन करून इतिहासकार इतिहासाची मांडणी करतो.

३. घडलेल्या प्रत्येक घटनेची नोंद करून तिचे ज्ञान मिळवण्यास मर्यादा येतात. त्यामुळे, इतिहासकार त्याला वाचकांपर्यंत जे पोहोचवायचे आहे, त्या दृष्टिकोनाच्या चौकटीत बसतील अशा काही घटनांची निवड करतो.
उदा. एखाद्या इतिहासकाराला शिवाजी महाराजांचा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर तो त्यांच्या समकालीन राज्यकर्त्यांचा अभ्यास करतोच; मात्र इतिहासाची मांडणी करताना तो शिवाजी महाराजांना केंद्रस्थानी ठेवून तत्कालीन कालखंडाची मांडणी करतो.

४. विशिष्ट वैचारिक दृष्टिकोनातून इतिहासकार निवडक घटनांची मांडणी करतो. या सर्व गोष्टींवर त्याची लेखनाची शैली निश्चित होते. 

shaalaa.com
इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा (परिचय)
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.1: इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा - संक्षिप्त उत्तरे १

APPEARS IN

SCERT Maharashtra Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.1 इतिहासलेखन : पाश्चात्त्य परंपरा
संक्षिप्त उत्तरे १ | Q २. (ब) ३.

RELATED QUESTIONS

पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

       ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली, असे सद्यपरिस्थितीत म्हणता येईल. सुमेर राज्यात होऊन गेलेले राजे, यांच्यामधील संघर्षाच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत. त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमारे ४५०० वर्षांपूर्वी सुमेर मधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धाची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुव्र या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवला आहे.

१. ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याची परंपरा कोणत्या संस्कृतीत झाली?

२. सर्वाधिक प्राचीन शिलालेख कोणत्या संग्रहालयात आहे?

३. शिलालेख हे इतिहासाचे साधन कसे ठरते यावर तुमचे मत व्यक्त करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×