English

टीप लिहा. मराठा चित्रशैली - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

टीप लिहा.

मराठा चित्रशैली

Short/Brief Note
Advertisements

Solution 1

मराठा चित्रकला शैली:

  • ही शैली इ.स. १७ व्या शतकाच्या उत्तरार्धात विकसित होऊ लागली.
  • या शैलीत रंगीत चित्रांचा समावेश असतो.
  • ही शैली भित्तिचित्रे (भिंतीवरील चित्रे) आणि हस्तलिखितांमध्ये वापरली जाणारी लघुचित्रे या स्वरूपात आढळते.
  • भित्तिचित्रे प्रामुख्याने जुन्या वाड्यांमध्ये, मंदिरे, छतांवर इत्यादी ठिकाणी पाहायला मिळतात.
  • मराठा शैलीवर राजपूत आणि युरोपीय चित्रकला शैलींचा प्रभाव आहे.
shaalaa.com

Solution 2

इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली.

  1. सचित्र हस्तलिखित पोथ्या, पोथ्यांच्या खाली आणि वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यांवरील चित्रे, काचचित्रे आणि भित्तिचित्रे या विविध स्वरूपांत मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो.
  2. या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भित्तिचित्रे आणि हस्तलिखितांमधील लघुचित्रे यांच्या स्वरूपांतील आहेत.
  3. वाड्यांचा दर्शनी भाग, दिवाणखाने, मंदिरांचे मंडप, शिखरे व छत यांवर मराठा चित्रशैलीतील भित्तिचित्रे पाहण्यास मिळतात.
  4. या चित्रशैलीवर राजपूत आणि माळवा चित्रशैलीचा; तसेच युरोपीय चित्रशैलीचा प्रभाव पडलेला दिसून येतो.
shaalaa.com
कला म्हणजे काय ?
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.4: भारतीय कलांचा इतिहास - स्वाध्याय [Page 31]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 1.4 भारतीय कलांचा इतिहास
स्वाध्याय | Q २. (३) | Page 31
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×