English

श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट

Advertisements
Advertisements

Question

श्रीमती मल्होत्रा यांनी 85,000 रुपये करपात्र किमतीचे सोलार ऊर्जा संच विकत घेतले व 90,000 रुपयांना विकले. वस्तू व सेवा कराचा दर 5% असल्यास त्यांना या व्यवहारात किती रुपयांची वजावट (ITC) व किती रुपये कर भरावा लागेल?

Sum
Advertisements

Solution

आऊटपुट टॅक्स = ₹ 90,000 चे 5%

`= 5/100 xx 90,000` = ₹ 4,500

इनपुट टॅक्स = 85,000 चे 5%

= `5/100 xx 85,000` = ₹ 4,250

∴ इनपुट टॅक्स क्रेडिट = ₹ 4,250

∴ देय उएऊ = आऊटपुट टॅक्स – इनपुट टॅक्स क्रेडिट

= 4,500 – 4,250

∴ देय कर = ₹ 250

∴ श्रीमती मल्होत्रा यांना ₹ 4,250 ची वजावट मिळेल व त्यांना ₹ २५० कर भरावा लागेल.

shaalaa.com
व्यवसाय साखळीतील जी.एस.टी.
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4A [Page 110]

APPEARS IN

Balbharati Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 4 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4A | Q 5 | Page 110

RELATED QUESTIONS

चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.


नझमा या जीएसटी कायदाअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.


अमीर एंटरप्राइझने चॉकलेट सॉसच्या बाटल्या खरेदी करताना 3800 रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबरी ब्रदर्सला विकताना 4100 रुपये जीएसटी गोळा केला. मयंक फूड कॉर्नरने अकबरी ब्रदर्सकडून त्या बाटल्या 4500 रुपये जीएसटी देऊन विकत घेतल्या, तर प्रत्येक व्यवहारात देय जीएसटी काढा. त्यावरून प्रत्येकाला भरावा लागणारा केंद्राचा देय कर (CGST) व राज्याचा देय कर (SGST) काढा.


मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन साैंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.


स्टीलच्या भांड्यांवरील वस्तू व सेवा कराचा दर 18 % आहे, तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर ______ आकारण्यात येतो.


GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.


एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?


सुरत, गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 2.5 लाख करपात्र किमतीचे सुती कपडे राजकोट, गुजरात येथील व्यापाऱ्याला विकले, तर या व्यवहारात राजकोटमधील व्यापाऱ्याला 5% दराने किती रुपये जीएसटी द्यावा लागेल?


एका ठोक व्यापाऱ्याने 1,50,000 रुपये करपात्र किमतीचे विद्युत साहित्य खरेदी केले. ते सर्व साहित्य किरकोळ व्यापाऱ्यास 1,80,000 रुपये करपात्र किमतीला विकले. किरकोळ व्यापाऱ्याने ते सर्व साहित्य ग्राहकाला 2,20,000 रुपये करपात्र किमतीला विकले, तर 18% दराने

  1. ठोक व किरकोळ विक्रीच्या करबीजकांतील करांची आकारणी करा.
  2. ठोक व्यापाऱ्याचा, तसेच किरकोळ व्यापाऱ्याचा देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा

अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्युम क्लिनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्युम क्लिनर 16,800 रुपये करपात्र किमतीस विकला, तर या व्यवहारातील खालील किमती काढा.

  1. अण्णा पाटलांनी बनवलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल?
  2. वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल?
  3. वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे करभरणा करावयाचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×