Advertisements
Advertisements
Question
अण्णा पाटील (ठाणे, महाराष्ट्र) यांनी 14,000 रुपये करपात्र किमतीचा एक व्हॅक्युम क्लिनर वसई (मुंबई) येथील एका व्यापाऱ्यास 28% GST दराने विकला. वसईतील व्यापाऱ्याने ग्राहकास तो व्हॅक्युम क्लिनर 16,800 रुपये करपात्र किमतीस विकला, तर या व्यवहारातील खालील किमती काढा.
- अण्णा पाटलांनी बनवलेल्या कर बीजकात केंद्राचा व राज्याचा कर किती रुपये दाखवला असेल?
- वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा किती कर आकारला असेल?
- वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे करभरणा करावयाचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर किती येईल ते काढा.
Advertisements
Solution
1) अण्णा पाटील यांसाठी:
आऊटपुट टॅक्स = 14,000 चे 28%
`= 28/100 xx 14,000` = ₹ 3,920
∴ केंद्राचा कर = राज्याचा कर = `"देय कर"/2 = 3920/2` = ₹ 1,960
∴ अण्णा पाटलांनी दिलेल्या कर बीजकातील केंद्राचा व राज्याचा कर प्रत्येकी ₹ 1,960 आहे.
2) वसईच्या व्यापाऱ्यासाठी:
आऊटपुट टॅक्स = 16,800 चे 28%
`= 28/100 xx 16,800`
= ₹ 4,704
∴ केंद्राचा कर = राज्याचा कर = `"देय कर"/2 = 4704/2` = ₹ 2,352
∴ वसईच्या व्यापाऱ्याने ग्राहकास केंद्राचा व राज्याचा कर प्रत्येकी ₹ 2,352 आकारला आहे.
3) इनपुट टॅक्स क्रेडिट = 14,000 चे 28%
`= 28/100 xx 14,000` = 3,920
इनपुट टॅक्स क्रेडिट = ₹ 3,920
वसईच्या व्यापाऱ्याचा देय जीएसटी
= आऊटपुट टॅक्स – इनपुट टॅक्स क्रेडिट
= 4,704 - 3,920
= ₹ 784
∴ केंद्राचा कर = राज्याचा कर = `"देय जीएसटी"/2 = 784/2` = ₹ 392
∴ वसईच्या व्यापाऱ्यासाठी शासनाकडे कर भरणा करताना केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर प्रत्येकी ₹ 392 आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
चेतना स्टोअर्सने 01 जुलै 2017 ते 31 जुलै 2017 या कालावधीत केलेल्या खरेदीवर 1,00,500 रुपये जीएसटी दिला व विक्रीवर 1,22,500 रुपये जीएसटी गोळा केला, तर सदर कालावधीत चेतना स्टोअर्सला भरावा लागणारा देय जीएसटी काढा.
नझमा या जीएसटी कायदाअंतर्गत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी 12,500 रुपये दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी 14,750 रुपये गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा.
चंदीगढ हे संघराज्य आहे. येथील मलिक गॅस एजन्सीने काही गॅस टाक्या 24,500 रुपयांना खरेदी केल्या व तेथील ग्राहकांना 26,500 रुपयांना विकल्या. या व्यवहारात 5% दराने देय असलेला एकूण जीएसटी काढा व त्यावरून केंद्राचा देय कर (CGST) व संघराज्याचा देय कर (UTGST) काढा. (संघराज्यात SGST ऐवजी UTGST असतो.)
मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने 6000 रुपयांवर 18% दराने जीएसटी देऊन साैंदर्य प्रसाधनांची खरेदी केली आणि एकाच ग्राहकास ती सर्व 10000 रुपयांना विकली, तर या व्यवहारासाठीचे मे. ब्युटी प्रॉडक्ट्स ने तयार केलेल्या करबीजकात केंद्राची व राज्याची (CGST व SGST) देय असणारी वस्तू व सेवा कराची रक्कम किती दाखवली असेल ते काढा.
खाली दिलेल्या माहितीवरून दुकानदार ते ग्राहक (B2C) यासाठीचे करबीजक (Tax Invoice) तयार करा.
नाव, पत्ता, तारीख इत्यादी तुमच्या पसंतीनुसार घ्या.
पुरवठादार: मे ______ पत्ता ______ राज्य ______ तारीख ______ इनव्हॉइस क्रमांक ______ GSTIN ______
वस्तूचा तपशील:
| मोबाइल बॅटरीचा दर | ₹ 200 | 1 नग | GST चा दर | 12 % | HSN 8507 |
| हेडफोनचा दर | ₹ 750 | 1 नग | GST चा दर | 18 % | HSN 8518 |
जीवनावश्यक वस्तूंवरील वस्तू व सेवा कराचा दर ______ आहे.
GSTIN मध्ये एकूण ______ अंकाक्षरे असतात.
जेव्हा एखादा नोंदणीकृत व्यापारी दुसऱ्या नोंदणीकृत व्यापाऱ्यास वस्तू विकतो, तेव्हा त्याला उएऊ अंतर्गत _____ व्यवहार म्हणतात.
एका तयार कपड्यांच्या दुकानात 1000 रुपये किमतीच्या ड्रेसवर 5% सूट देऊन उरलेल्या रकमेवर 5% GST लावून तो विकला, तर तो ग्राहकाला किती रुपयांना पडेल?
Z-सिक्युरिटी सर्व्हिसेस देणाऱ्या कंपनीने 64,500 रुपये करपात्र किमतीची सेवा पुरवली. वस्तू सेवा कराचा दर 18% आहे. या सिक्युरिटी सर्व्हिसेस पुरवण्यासाठी कंपनीने लॉन्ड्री सर्व्हिसेस व युनिफॉर्मस् इत्यादी बाबींवर एकूण 1,550 रुपये वस्तू सेवा कर भरला आहे, तर या कंपनीचा (इनपुट टॅक्स क्रेडिट) ICT किती? त्यावरून देय सीजीएसटी व देय एसजीएसटी काढा.
