English

शास्त्रीय कारणे लिहा. पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे. - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

शास्त्रीय कारणे लिहा.

पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.

Answer in Brief
Explain
Advertisements

Solution

  1. मानवी जीवन हा निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे आणि मानवाचे जीवन पर्यावरणाशी घट्ट जोडले गेले आहे.
  2. मानवी लोकसंख्या व औद्योगिकीकरण यांची झपाट्याने वाढ होत असल्याकारणाने माणसाकडून नैसर्गिक संसाधनाचा अवाजवी वापर होत आहे व त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
  3. मानवी जीवनावर पर्यावरणाचा प्रभाव असतो, तसेच मानव आपल्या सोयीनुसार सभोवतालच्या पर्यावरणात बदल घडवून आणू शकतो, कारण अन्नसाखळीत सर्वोच्च भक्षक म्हणून सगळ्यांत वरचे स्थान मानवाचे आहे.
  4. मानवामध्ये निसर्गाचे संवर्धन करण्याची व त्याच्या गुणवत्तेत सुधारणा करण्याची क्षमता आहे आणि म्हणूनच निसर्गाचा समतोल साधण्यात मानव प्रमुख भूमिका निभावू शकतो. यामुळे, पर्यावरणामध्ये मानवाला महत्त्वाचे स्थान आहे.
    म्हणूनच, पर्यावरण समतोलामध्ये मानवाची भूमिका महत्त्वाची आहे.
shaalaa.com
पर्यावरण संवर्धन : आपली सामाजिक जबाबदारी
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: पर्यावरणीय व्यवस्थापन - शास्त्रीय कारणे लिहा

APPEARS IN

SCERT Maharashtra Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC
Chapter 4 पर्यावरणीय व्यवस्थापन
शास्त्रीय कारणे लिहा | Q 2
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×