Advertisements
Advertisements
Question

Advertisements
Solution
दिनांक: 6 डिंसेबर, 2024
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
सुसंस्कार पुस्तकालय,
निर्मलबाग,
नागपूर - xxx xxx
ई-मेल: [email protected]
विषय: शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करण्याबाबत.
महोदय,
मी पंकज पाटील, आदर्श विद्यालय, नागपूर येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून हे पत्र पाठवत आहे. आपल्या सुसंस्कार पुस्तकालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेले निवेदन आम्ही वाचले. आमच्या शालेय ग्रंथालयासाठी काही पुस्तके आवश्यक आहेत.
पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे:
| क्र. | पुस्तकाचे नाव | लेखक | प्रती |
| १. | देह झाला चंदनाचा | राजेंद्र खेर | 5 |
| २. | श्यामची आई | पांडुरंग सदाशिव साने | 3 |
| ३. | शास्त्रीय मराठी व्याकरण | मोरो केशव दामले | 5 |
| ४. | ययाती | वि. स. खांडेकर | 4 |
| ५. | अग्निपंख | डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम | 7 |
आपण निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे शैक्षणिक संस्थांसाठी विशेष सवलत दिली जाईल, याची आम्हाला खात्री आहे. कृपया ही पुस्तके आमच्या शाळेच्या पत्त्यावर पाठवावीत आणि त्याबरोबर त्यांचे बिलही जोडावे. आम्ही ती रक्कम लवकरच ऑनलाईन पाठवू.
हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या संमतीने पाठवत आहे.
कळावे,
आपला विश्वासू,
पंकज पाटील,
(विद्यार्थी प्रतिनिधी)
आदर्श विद्यालय,
नागपूर - xxx xxx
ई-मेल: [email protected]
