Advertisements
Advertisements
Question

Advertisements
Solution
दिनांक: 6 डिंसेबर, 2024
प्रति,
माननीय व्यवस्थापक,
सुसंस्कार पुस्तकालय,
निर्मलबाग,
नागपूर - xxx xxx
ई-मेल: [email protected]
महोदय,
मी पूजा पाटील, सरस्वती विद्यालय, नागपूर येथील विद्यार्थी प्रतिनिधी, आपल्या प्रमुखाध्यापक आणि सर्व शिक्षकांच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करते.
सुसंस्कार पुस्तकालयाच्या निवेदनात आपण विद्यार्थ्यांना २०% सवलत तसेच शालेय संस्थांना विशेष सवलत दिली, ही बाब निश्चितच प्रशंसनीय आहे. पण गरजू व हुशार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके पुरविण्याचा निर्णय अधिकच स्तुत्य आहे.
फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता, समाजोपयोगी कार्य करत आहात, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नफा मिळवणे हेच उद्दिष्ट न ठेवता विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.
आपल्या या मूल्यवान उपक्रमासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते!
आपली कृपाभिलाषी,
पंकज पाटील,
(विद्यार्थी प्रतिनिधी)
आदर्श विद्यालय,
नागपूर - xxx xxx
ई-मेल: [email protected]
