Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा:
विपणी म्हणजे व्यवसायिकांचे व्यवहार चालणारी जागा.
Justify
Advertisements
Solution
- विपणी हा शब्द लॅटिन भाषेतील “मार्केट्स” या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ “व्यापार करणे”, “मालाची खरेदी-विक्री करणे” किंवा “व्यवसायाचे व्यवहार चालणारी जागा” असा होतो. साध्या-सोप्या शब्दात असे म्हणता येईल की, विपणी हे असे ठिकाण आहे जेथे दोन किंवा अधिक व्यक्ती (पक्ष) खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात. त्या दोन पक्षांना खरेदीदार व विक्रेते असे म्हणतात.
- विपणी ही अशी जागा आहे, जेथे अनेक लोक खरेदी व विक्रीच्या कार्यात गुंतलेले असतात. हे खरेदी-विक्रीचे व्यवहार पैशाच्या मोबदल्यात चालतात.
- जुन्या काळामध्ये विपणीची (बाजाराची) व्याख्या करताना ठिकाणाला फार महत्त्व होते, परंतु अलीकडच्या काळात माहिती व तंत्रज्ञानाच्या विकास झाल्यामुळे विपणी ही संज्ञा जागेबाबत फार व्यापक अर्थाने वापरली जाते.
- सर्वसाधारणपणे विपणी ही ठिकाण (स्थळ) दर्शवते. थोडक्यात विपणी म्हणजे व्यावसायिकांचे व्यवहार चालणारी जागा. ज्यात वस्तू, सेवा, माहिती, चलन अथवा त्यांचा संच जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवले (दिले) जातात.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
