English

पुढील संकल्पना स्पष्ट करा. शीतयुद्ध - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील संकल्पना स्पष्ट करा.

शीतयुद्ध

Answer in Brief
Advertisements

Solution

दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत रशिया युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. त्यांच्यातील सहकार्याची जागा स्पर्धेने घेतली. या स्पर्धेने जागतिक राजकारणाचा ४०-४५ वर्षांचा कालखंड व्यापला. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही; परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचे वर्णन शीतयुद्ध या संज्ञेद्वारे केले जाते. या काळात अमेरिका तर महासत्ता होतीच पण सोव्हिएत रशियानेही अण्वस्त्रांची निर्मिती करून व आपले लष्करी सामर्थ्य वाढवून महासत्ता बनण्याचा प्रयत्न केला. अमेरिका व सोव्हिएत रशिया या दोन महासत्तांमधील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, विचारप्रणालीतील भेद, परस्परांना शह-काटशह देण्याची वृत्ती या सर्व बाबींमुळेच शीतयुद्ध सुरू झाले होते.

shaalaa.com
शीतयुद्ध
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: महायुद्धोत्तर राजकीय घडामोड - स्वाध्याय [Page 64]

APPEARS IN

Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
Chapter 2.1 महायुद्धोत्तर राजकीय घडामोड
स्वाध्याय | Q ३. (१) | Page 64
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×