English

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा. व्यक्तिमत्त्वांवर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा. - Psychology [मानसशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील प्रश्‍नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.

व्यक्तिमत्त्वांवर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा.

Explain
Very Long Answer
Advertisements

Solution

  1. अनुवंश: पालकांकडून अपत्याकडे जन्माच्या वेळी संक्रमित होणारे सर्व गुणधर्म म्हणजे अनुवंश होय. अनुवंशाचा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीवर परिणाम होतो. उदा, उंची, वजन, अवयवांची प्रमाणबध्दता, डोळ्यांचा रंग इ. अनुवंशाने निर्धारित झालेली गुणवैशिष्ट्ये व्यक्तीच्या स्वसंकल्पनेवर प्रभाव पाडू शकतात व त्याचा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर परिणाम होऊ शकतो.
  2. अंतःस्रावी ग्रंथी: पियुषिका ग्रंथी, कंठस्थ ग्रंथी, स्वादुपिंड ग्रंथी, पीनियल ग्रंथी वृक्कस्थ ग्रंथी इत्यादी ग्रंथी व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीवर परिणाम करतात. विविध ग्रंथींमधून स्रवणारे हार्मोन्स कमी किंवा अधिक प्रमाणात स्रवल्यास त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो. उदा. कंठस्थ ग्रंथीमधून स्रवणाऱ्या थायरॉक्सिनचे प्रमाण वाढले असता व्यक्तीमध्ये उदासीनता, ताणतणाव, चिडचिडेपणा, अस्वस्थता, भावनिक अस्थिरता, निर्माण होते व त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  3. कुटुंब: कुटुंब हा व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कुटुंबाचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक व सामाजिक स्थिती, कुटुंबातील भावनिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरण कौटुंबिक वातावरण, कुटुंबातील सदस्यांच्या आंतरक्रिया, बालसंगोपनाच्या विविध पध्दती इत्यादी कुटुंबाशी संबंधित घटकांचा व्यक्तिमत्त्वावर ठळकपणे प्रभाव पडतो.
  4. समवयस्क गट: समवयस्क गट हा सामाजिक जीवनातील व्यापक घटक आहे. पूर्व बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत दैनंदिन जीवनात समवयस्क आपल्याबरोबर असतात. वर्गातील मित्रमैत्रिणी, कामाच्या ठिकाणचे सहकारी, क्रीडा मंडळातील सदस्य इत्यादींचा समवयस्क गटात समावेश होतो. समवयस्क गटाचा व्यक्तिमत्वावर सकारात्मक तसेच नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, नियमित अभ्यास करणे, स्वत:बद्दल व विरुद्धलिंगी व्यक्तींबद्दल योग्य अभिवृत्ती विकसित करणे, इत्यादी चांगल्या सवयींचा सुसंगतीमुळे विकास होऊ शकतो.
  5. शाळा: विदयार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात शाळेची भूमिका महत्त्वपूर्ण असते. अध्ययन-अध्यापन पद्धती, शैक्षणिक कृती आणि सहशालेय उपक्रम, शाळेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधा, शिक्षकांचा विदयार्थ्यांशी असलेला संवाद, शाळेतील शिस्त व शाळेची धोरणे, इत्यादी शाळेशी संबंधित घटकांचा विदयार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो.
  6. प्रसार माध्यमे: इंटरनेट आणि इतर प्रसारमाध्यमेही जवळजवळ प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहेत. प्रसारमाध्यमे ही मनोरंजन, अनौपचारिक शिक्षण आणि सामाजीकरण प्रक्रियेचा स्रोत आहेत. आजकाल, किशोरावस्थेतील बहुतांश मुले व मुली त्यांचा जास्तीत जास्त वेळ टी.व्ही., संगणक आणि मोबाईल फोन यांत व्यतीत करतात आणि त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्तावर परिणाम होऊ शकतो.
  7. संस्कृती: सांस्कृतिक घटकही व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची मूल्य, श्रद्धा, मापदंड असतात व त्यांचा व्यक्तींच्या विचारांवर, भावनांवर आणि वर्तानावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ - नेतृत्वगुण, श्रवण कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, सहकार्याची प्रवृत्ती इत्यादी घटकांत संस्कृतीनुसार तफावत आढळते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×