Advertisements
Advertisements
Question
पुढील निवेदन वाचा व किलबिल बाल-उद्यानात संपन्न झालेला 'स्वातंत्र्यदिन अमृत महोत्सव' या कार्यक्रमाची बातमी लिहा:
|
सर्व जनतेला हार्दिक निमंत्रण!!! भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव... अध्यक्ष: मा. नामदेव गावस्कर (माजी सैनिक) प्रमुख पाहुणे: डॉ. वर्षा कुंबळे (पर्यावरण तज्ज्ञ) वेळ: सकाळी ९.०० वाजता स्थळ: किलबिल बाल-उद्यान, भिलगाव, वर्धा. |
Advertisements
Solution
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा अमृतसोहळा!
(आमच्या प्रतिनिधीकडून)
भिलगाव, वर्धा, दि. १६ ऑगस्ट: काल दिनांक १५ ऑगस्ट रोजी, सकाळी ९ वाजता, किलबिल बाल-उद्यान, भिलगाव, वर्धा येथे भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी सैनिक माननीय नामदेव गावस्कर यांनी भूषवले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण तज्ज्ञ डॉ. वर्षा कुंबळे उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील तमाम जनसमुदाय जमला होता. सकाळी ९ वाजता अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्वांनी आत्मीयतेने आणि खड्या स्वरात राष्ट्रगीत म्हटले. 'भारतमाता की जय!!' असा गगनभेदी घोष करण्यात आला. त्यानंतर वक्तृत्वस्पर्धा व निबंधस्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रमुख अतिथींच्या हस्ते पार पडला. दोन विद्यार्थी व दोन विद्यार्थिनी यांनी 'भारत माझा प्रिय देश आहे!' या विषयावर सुंदर भाषण दिले.
शेवटी प्रमुख पाहुण्यांचे व अध्यक्षीय भाषण होऊन कार्यक्रम समाप्त झाला.
