English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा: [मुद्दे: एक गावकरी - तीर्थयात्रेला जाणे - स्वतःजवळचे दागिने शेजारच्या व्यापाऱ्याजवळ ठेवणे - परत आल्यावर व्यापाऱ्याकडून नकार - 'दागिने उंदरांनी खाल्ले' - गावकऱ्याने - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा:

[मुद्दे: एक गावकरी - तीर्थयात्रेला जाणे - स्वतःजवळचे दागिने शेजारच्या व्यापाऱ्याजवळ ठेवणे - परत आल्यावर व्यापाऱ्याकडून नकार - 'दागिने उंदरांनी खाल्ले' - गावकऱ्याने सावकाराच्या (व्यापाऱ्याच्या) मुलाला लपवणे - 'फुलपाखरांनी नेले' - व्यापाऱ्याने चूक कबूल करणे.]

Writing Skills
Advertisements

Solution

जशास तसे!

एका गावात विश्‍वनाथ नावाचे गावकरी राहत होते. त्यांची राहणी साधी होती. ते देवभक्त होते. दरवर्षी ते तीर्थयात्रेला जात असत. त्यांच्या शेजारी मोहनशेठ नावाचे व्यापारी राहत होते.

एकदा विश्‍वनाथ तीर्थयात्रेला निघाले. दहा दिवसांचा मुक्काम असल्यामुळे त्यांनी त्यांच्याजवळचे दागिने मोहनशेठकडे ठेवायला दिले. ''तीर्थयात्रेवरून आल्यावर मला परत करा", असे विश्‍वनाथ मोहनशेठ यांना म्हणाले. मोहनशेठ यांनी “दागिने नीट जपून ठेवतो. तुम्ही निर्धास्त तीर्थयात्रेला जा" असे विश्‍वनाथ यांना सांगितले. विश्‍वनाथ शांत मनाने तीर्थयात्रेला रवाना झाले.

दहा दिवसांनी विश्‍वनाथ तीर्थयात्रेवरून परत आले. त्यांनी आणलेला तीर्थप्रसाद मोहनशेठ यांना मोठ्या भक्तिभावाने दिला व आपल्या दागिन्यांची मागणी केली. तेव्हा मोहनशेठ विश्‍वनाथांना म्हणाले, “तुमचे दागिने मी तिजोरीत जपून ठेवले होते. पण तुमचे दुर्दैव असे की, ते दागिने उंदरांनी खाल्ले. आता काय करावे?" मोहनशेठ यांची लबाडी विश्‍वनाथांच्या लक्षात आली. ते निमूट घरी परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी मोहनशेठ यांचा छोटा मुलगा महेश विश्‍वनाथांकडे खेळायला आला. बरीचशी खेळणी देऊन विश्‍वनाथांनी महेशला एका खोलीत लपवून ठेवले. संध्याकाळी मोहनशेठ महेशला शोधत आले. त्यांनी विश्‍वनाथ यांना विचारले की, “महेश तुमच्याकडे खेळायला आला होता का?" विश्‍वनाथ म्हणाले, “हो, महेश आला होता, तो माझ्याकडेच एका खोलीत खेळत होता. पण काय झाले की त्याला फुलपाखरांनी नेले सोबत दूर डोंगरापार!"

मोहनशेठ यांना त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी विश्‍वनाथ यांचे लपवलेले दागिने परत केले. यालाच म्हणतात ठकास महाठक!!

तात्पर्य: स्वार्थीपणाने दुसर्‍याच्या गोष्टीचा मोह धरू नये.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×