English

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा: विंचू चावला वृश्चिक चावला। कामक्रोध विंचू चावला। तम घाम अंगासी आला।।धृ.।। भारुडातील विंचू या विकारांचे प्रतीक आहे - Marathi

Advertisements
Advertisements

Question

पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:

विंचू चावला वृश्चिक चावला।
कामक्रोध विंचू चावला।
तम घाम अंगासी आला।।धृ.।।

पंचप्राण व्याकुळ झाला।
त्याने माझा प्राण चालिला।
सर्वांगाचा दाह झाला।।१।।

मनुष्य इंगळी अति दारुण।
मज नांगा मारिला तिनें।
सर्वांगी वेदना जाण।
त्या इंगळीची।।२।।

ह्या विंचवाला उतारा।
तमोगुण मागें सारा।
सत्त्वगुण लावा अंगारा।
विंचू इंगळी उतरे झरझरां।।३।।

सत्त्व उतारा देऊन।
अवघा सारिला तमोगुण।
किंचित्‌ राहिली फुणफुण।
शांत केली जनार्दनें।।४।।

  1. (आकलन)    (२)
    भारुडातील विंचू हे या विकारांचे प्रतीक आहे -
    य) ----------------
    (र) ----------------
  2. (आकलन)    (२)
    विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय -
    (य) ----------------
    (र) ----------------
  3. (अभिव्यक्ती)    (४)
    'दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे.' हे या भारुडाच्या आधारे स्पष्ट करा.
Comprehension
Advertisements

Solution

  1. य) काम
    (र) क्रोध
  2. (य) तमोगुण मागे सारणे.
    (र) सत्त्वगुणांचा अंगारा लावणे
  3. ‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी दुर्गुण म्हणजेच काम आणि क्रोध या वाईट प्रवृत्तींचे विंचूशी केलेले सुंदर प्रतीकात्मक वर्णन आहे. ते सांगतात की, एकदा का या काम-क्रोधरूपी विंचूने चावले, की त्याचा दाह इतका तीव्र असतो की पंचप्राण व्याकूळ होतात. येथे विंचू म्हणजे दुर्जनांचा संग आणि त्यांच्यामध्ये असलेले वाईट गुण.

    दुर्जनांची संगत म्हणजे जणू विंचवाच्या दंशासारखी असून ती माणसाला अधःपाताकडे नेत असते. अशा संगतीमुळे आपणही दुर्गुणी होतो. म्हणूनच संत एकनाथ महाराज सांगतात की, यावर उपाय म्हणजे सज्जन व्यक्तींचा संग – म्हणजेच सत्संग करणे. जेव्हा आपण सत्संग करतो, तेव्हा चांगल्या विचारांचा, सद्गुणांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (July) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×