Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा:
|
विंचू चावला वृश्चिक चावला। पंचप्राण व्याकुळ झाला। मनुष्य इंगळी अति दारुण। ह्या विंचवाला उतारा। सत्त्व उतारा देऊन। |
- (आकलन) (२)
भारुडातील विंचू हे या विकारांचे प्रतीक आहे -
य) ----------------
(र) ---------------- - (आकलन) (२)
विंचू-इंगळी उतरवण्याचे उपाय -
(य) ----------------
(र) ---------------- - (अभिव्यक्ती) (४)
'दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशाइतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे.' हे या भारुडाच्या आधारे स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
- य) काम
(र) क्रोध - (य) तमोगुण मागे सारणे.
(र) सत्त्वगुणांचा अंगारा लावणे -
‘विंचू चावला’ या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी दुर्गुण म्हणजेच काम आणि क्रोध या वाईट प्रवृत्तींचे विंचूशी केलेले सुंदर प्रतीकात्मक वर्णन आहे. ते सांगतात की, एकदा का या काम-क्रोधरूपी विंचूने चावले, की त्याचा दाह इतका तीव्र असतो की पंचप्राण व्याकूळ होतात. येथे विंचू म्हणजे दुर्जनांचा संग आणि त्यांच्यामध्ये असलेले वाईट गुण.
दुर्जनांची संगत म्हणजे जणू विंचवाच्या दंशासारखी असून ती माणसाला अधःपाताकडे नेत असते. अशा संगतीमुळे आपणही दुर्गुणी होतो. म्हणूनच संत एकनाथ महाराज सांगतात की, यावर उपाय म्हणजे सज्जन व्यक्तींचा संग – म्हणजेच सत्संग करणे. जेव्हा आपण सत्संग करतो, तेव्हा चांगल्या विचारांचा, सद्गुणांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपले दुर्गुण नाहीसे होतात. दुर्गुणाच्या इंगळीचा दाह शमतो. म्हणून सत्संग हा दाह शांत करणारा एकमेव उपाय आहे, असे संत एकनाथ महाराज म्हणतात.
