English

न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे? - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

न्यायालयाने दिलेल्या कोणकोणत्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झालेली आहे?

Long Answer
Advertisements

Solution 1

न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांमुळे महिलांच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची जपणूक होण्यास मदत झाली.

  1. घटस्फोटित महिलांना पोटगी देण्याचे पुरुषांवरील बंधन तसेच समान कामासाठी स्त्रियांना पुरुषांएवढेच वेतन, या कायद्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
  2. वडिलांच्या संपत्तीत विवाहित मुलींचाही समान वाटा असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे स्त्रियांना आर्थिक सुरक्षितता मिळाली.
  3. प्रार्थनास्थळी सर्व स्त्रियांना मुक्त स्वातंत्र्य असेल, या न्यायालयाच्या निर्णयामुळे सर्व धर्मातील स्त्रियांना प्रतिष्ठा मिळाली.
  4. खाप पंचायतीचे अधिकार न्यायालयानेच रदबातल केल्यामुळे स्त्रियांवर घातली जाणारी बंधने दूर होऊन त्यांना न्याय मिळाला.
    न्यायालयाने दिलेल्या निर्णयांतून स्त्रियांना प्रतिष्ठा आणि सन्मान देणारे अनेक कायदे संसदेला करावे लागले.
shaalaa.com

Solution 2

न्यायालये ही भारतातील व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करतात. महिलांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेची जपणूक करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने पुढील निर्णय दिले आहेत.

  1. महिला सक्षमीकरणासाठी, समाजात महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी न्यायालयाने काही कायदे केले आहेत. उदा. हुंडा प्रतिबंधक कायदा हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली आहे.
  2. वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा देणारा कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा इत्यादी महत्त्वपूर्ण तरतुदी व निर्णयांमुळे महिलांच्या सन्मान व प्रतिष्ठेची जपणूक झाली आहे.
shaalaa.com
सामाजिक न्याय व समता
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संविधानाची वाटचाल - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2.1 संविधानाची वाटचाल
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (३)
Balbharati Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q ४. (३) | Page 74
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×