Advertisements
Advertisements
Question
नवजीवन विद्यालय, भंडारा या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
Advertisements
Solution
नवजीवन विद्यालय, भंडारा येथे वसुंधरा दिनानिमित्त 'शिक्षक दिन' संपन्न.
भंडारा, दि. ६ सप्टेंबर: भंडारा येथील नवजीवन विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री. अरुण कदम यांनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या दिवसाचे औचित्य साधून विदयार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका यशस्वीरित्या पार पाडून शाळेतील शिक्षकांना अध्यापनाच्या कामातून एक दिवस विश्रांती दिली. या दिवशी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश प्रभू यांनी संस्थेकडून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा बापट यांना 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार जाहीर केला.
क्रीडाशिक्षक झालेल्या कु. आदित्य सावंत याने शिस्तबद्ध प्रार्थना घेतली. कु. अथर्व जोशी या विद्यार्थ्यांने मुख्याध्यापक या नात्याने सूत्रे हाती घेऊन पहिल्या पाच तासिकांची शाळा उत्तम प्रकारे चालविली. शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांनी अध्यापनाची उत्तम तयारी करून, वर्गावर्गात जाऊन उत्तम प्रकारे शिकविले. शिपाई झालेल्या तीन विदयार्थ्यांनीही शिपायांची कामे न लाजता चांगल्या प्रकारे केली.
मधल्या सुट्टीनंतर शाळेच्या सभागृहात शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग व आजचे शिक्षक झालेले विद्यार्थी सर्वजण एकत्र जमले. आजच्या 'श्री गुरवे नमः' या कार्यक्रमाचे सादरीकरण व सूत्रसंचालनही विद्यार्थी-शिक्षकांनीच केले. शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व मग त्यांनी दीपप्रज्वलन केले. नंतर विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका व शिक्षक यांचा गुणगौरव करणारी भाषणे केली. त्यानंतर सर्व उपस्थित शिक्षकांना विद्यार्थ्याकडून गुलाबपुष्प व संस्थाचालकांकडून भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक यांनी विद्यार्थी शिक्षकांचे खूप कौतुक केले. संस्थाचालकांकडून मुख्याध्यापिकांना 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार प्रदान करण्यात आला. “आईवडील, गुरुजन, थोर समाजसेवक, ग्रंथ, निसर्ग या प्रत्येकाकडून चांगले गुण घ्या. यशवंत व्हा, जयवंत व्हा, कीर्तिवंत व्हा,” असा मोलाचा संदेश माननीय मुख्याध्यापिकांनी आपल्या भाषणातून दिला.
शेवटी संस्थाचालकांकडून सर्वांना अल्पोपहार देण्यात आला व कार्यक्रमाची सांगता झाली.
