English

मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा. - Marathi

Advertisements
Advertisements

Question

मुलाखतीची सुरुवात स्पष्ट करा.

Very Long Answer
Advertisements

Solution

मुलाखतीचा प्रारंभच मुळी अत्यंत आकर्षक, चटपटीत, थेट श्रोत्यांच्या/वाचकांच्या काळजाला जाऊन भिडणारा झाला पाहिजे. मुलाखतकाराच्या पहिल्या चार-सहा वाक्यांतच श्रोते/वाचक त्या मुलाखतीच्या श्रवणात/ वाचनात मनाने पूर्णतः गुंतले गेले पाहिजेत. ‘वेल बिगन इज हाफ डन्‌’ असे जे म्हणतात ते याच अर्थाने. मॅचच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या फलंदाजाने चेंडू थेट सीमारेषेबाहेर टोलवल्याचा आनंद झाला पाहिजे आणि तेही अगदी नैसर्गिकपणे, सहजपणे, ओघाओघात घडले पाहिजे. त्याला कृत्रिमतेचा जरासाही स्पर्श होता कामा नये. त्यासाठी मुलाखतकाराला मुलाखतदात्याचा स्वभाव, शैली नेमकी माहीत असली पाहिजे. एखादा नवाकोरा चुटका, ताजा किस्सा सांगून त्याच्या शेवटी तितक्याच नेमक्या, टोकदार प्रश्‍नाचा बॉल सुरुवातीलाच मुलाखतदात्याच्या कोर्टात भिरकावता येतो. मुलाखतीची पहिली ओव्हर अशा हलक्याफुलक्या, दिलखुलास चेंडूंनी सुरू करावी. त्यामुळे सर्वांच्याच मनावरचा ताण सैल होतो. वातावरण मोकळे, हलके होते. मुलाखतीची ही नांदी जितकी जास्त श्रवणीय होईल तितकी पुढची मैफल अधिकाधिक रंगतदार होत जाईल, मुलाखतकाराचा आत्मविश्‍वास दुणावत जाईल, मुलाखतदाता खुलेल आणि श्रोते/वाचक त्या मुलाखतीत गुंतून जातील.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×