English

लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.

Advertisements
Advertisements

Question

लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दांत लिहा.

Short/Brief Note
Advertisements

Solution

लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो.
माझ्या भाषेकडे बारकाईने पाहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. 'चालणे' हे साधे क्रियापद बघा. प्रत्यक्ष पायांनी चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा 'चालणे' या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटूलुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा-नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखाद्या रितीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे, अशी किती वाक्ये सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वत:च्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे.

shaalaa.com
बोलतो मराठी...
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: बोलतो मराठी - कृती [Page 4]

APPEARS IN

Balbharati Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2 बोलतो मराठी
कृती | Q (७) (इ) | Page 4

RELATED QUESTIONS

आकृत्या पूर्ण करा.


आकृत्या पूर्ण करा.


शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा.


पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

मराठी भाषेची खास शैली - ______


पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा - 


पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा.

शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - ______


गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.


गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.


गटात न बसणारा शब्द ओळखा.


गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा.


‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थच्छटा लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

  परवा वर्तमानपत्रात एक विनोद आला होता.
बायको : ‘तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का?’ 
नवरा : ‘नको. मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार!’
         आता इथे विनोद निर्माण झाला आहे. कारण ‘बनवणे’ हे क्रियापद तिथे शोभणारे नाही. ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलं आहे. मराठीत पोळ्या लाटणे, भाजी फोडणीस टाकणे, कढी करणे, भात रांधणे, कुकर लावणे अशा वेगवेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत; पण हल्ली सगळे पदार्थ फक्त ‘बनवले’ जातात. मराठीत 'बनवणे’ म्हणजे ‘फसवणे’ असा अर्थ खरं तर रूढ आहे, त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस 'बनवणारा’ जादूगार, विनोद करणाऱ्या नवऱ्याला आठवला, तर आश्चर्य नाही.
         मराठी ढंगाचे शब्दप्रयोग ही आपल्या भाषेची श्रीमंती आहे. मराठीत ‘मारणे’ हे एक क्रियापद घेतले तर ते किती वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते, हे लक्षात घेण्याजोगे आहे. जसे, गप्पा मारणे, उड्या मारणे, थापा मारणे, टिचकी मारणे, शिट्टी मारणे, पाकीट मारणे, जेवणावर ताव मारणे, (पोहताना) हातपाय मारणे, माश्या मारणे इत्यादी. ‘मारणे’ म्हणजे ‘मार देणे’ हा अर्थ यात कोठेही आलेला नाही. हीच तर भाषेची गंमत असते. शब्दप्रयोगाप्रमाणे वाक्प्रचार हीदेखील भाषेची खास शैली असते.

१) कृती सोडवा.  (२)

  1. हिंदी भाषेतून आलेले आणि स्वयंपाकघरात घुसलेले क्रियापद -
  2. मराठी भाषेची खास शैली -

२) आकृतिबंध पूर्ण करा.  (२)

३) स्वमत कृती:  (३)

‘तुम्ही शहाणे आहात’ या वाक्यातील ‘शहाणे’ या शब्दाच्या अर्थछटा लिहा.


उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृती पूर्ण करा.  (2)

      भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही असते. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमधले शब्द आपले मानले आहेत. 'टेबल' हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही; पण गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण झुगारून वापरणे योग्य नाही. 'मी स्टडी केली' म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? त्याऐवजी 'मी अभ्यास केला' म्हणणं योग्य नाही का?
      भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते. 'मोरांबा' या शब्दातल्या 'मोरा' चा मयुराशी संबंध नसून मोरस म्हणजे साखरेशी (जुन्या काळी साखर मॉरिशसवरून यायची म्हणून मोरस) संबंध आहे. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात, ते त्यातून कळते.
      'कदर करणे' असे आपण म्हणतो. तो वाक्प्रचार आहे. 'कद्र' या अरबी शब्दापासून 'कदर' (म्हणजे गुणांची पारख) हा शब्द आपण घेतला आहे. शब्दांच्या मुळाकडे गेलो, की आपल्या चुकाही होत नाहीत. उदा., 'अनुसया' असे नाव नसून ते 'अनसूया' असे आहे. 'अन् +असूया' अशी त्यातील संधी आहे. मनात असूया (मत्सर) नसलेली अशी ती 'अनसूया' हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसेच 'जराजर्जर' या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे, 'वार्धक्याने विकल झालेला!' यातील 'ज' चे उच्चार तालव्य (ज्य) आहेत. तर जरा (थोडे), जर (कलाबूत) या शब्दातील 'ज' चे उच्चार दन्तमूलीय आहेत. (दन्तमूलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचा वरच्या दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी.) उच्चारावरही अर्थ अवलंबून असतो.
      भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो, या साऱ्यांना महत्त्व असते. 'सूतकताई' हा शब्द जर 'सूतक ताई' असा लिहिला तर कसं वाटेल? तसंच 'अक्षरश:' हा शब्द लिहिताना 'अक्षर शहा' असे कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का?

2. रिकाम्या चौकटी भरा. (2)

अ) शब्द भलत्याच ठिकाणी तोडल्यामुळे होणाऱ्या गोंधळाचा शब्द - ______

आ) शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन - ______

3. स्वमत-  (3)

'गरज नसताना इतर भाषांमधील शब्द वापरून बोलू नये', या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×