English

कर्जरोख्यांचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा. - Secretarial Practice [चिटणिसाची कार्यपद्धती]

Advertisements
Advertisements

Question

कर्जरोख्यांचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा.

Explain
Advertisements

Solution

  1. तारण असलेले (सुरक्षित) कर्जरोखे: कर्जरोखे हे तारण ठेऊन सुरक्षित केले जातात. कंपनीच्या मालमत्तेवर प्रभार/बोजा निर्माण करून सुरक्षा दिली जाते. असा प्रभार कंपनीच्या एखाद्या मालमत्तेवर (स्थिर प्रभार) असू शकतो किंवा कोणत्याही मालमत्तेवर (तरता प्रभार) असू शकतो. ‘विश्वस्त करार’ करून कर्जरोखे सुरक्षित केले जातात.
  2. तारण नसलेले (असुरक्षित) कर्जरोखे: ज्या कर्जरोख्यांना तारण दिलेले नसते अशांना असुरक्षित कर्जरोखे असे म्हणतात. अशा कर्जरोखे विक्रीला कंपनी कायदा २०१३ ने परवानगी दिली आहे.
  3. नोंदविलेले कर्जरोखे: ज्या कर्जरोखेधारकांची नोंद, नोंदवहीत केलेली असते. त्यांना ‘नोंदविलेले कर्जरोखे’ असे म्हणतात. नोंदवहीत त्यांचे नाव, पत्ता व धारण केलेल्या कर्जरोख्यांची माहिती दिलेली असते. अशा कर्जरोख्यांचे हस्तांतरण रितसर पद्धतीने केले जाते.
  4. वाहक कर्जरोखे: ज्या कर्जरोखे धारकांची नावे कर्जरोख्यांवर नमूद केलेली नसतात तसेच कंपनीच्या नोंदवहीमध्येही त्यांची नोंद केलेली नसते. हे कर्जरोखे दुसऱ्याला सुपुर्द करून हस्तांतरित होतात. ‘व्याज कूपन’ द्वारे या कर्जरोख्यांना व्याज दिले जाते.
  5. परतफेडीचे कर्जरोखे: या कर्जरोख्यांची परतफेड एका ठरावीक मुदतीनंतर केली जाते, ही मुदतीची तारीख ‘कर्जरोखे प्रमाणपत्रावर’ नमूद केलेली असते. मुदत संपल्यानंतर कर्जरोखे धारकाला एकूण सर्व रक्कम एकत्रित परत दिली जाते किंवा टप्प्याटप्प्याने रकमेची परतफेड केली जाते. परतफेडीची तरतूद विश्वस्त करारामध्ये नमूद केलेली असते.
  6. न परतफेडीचे कर्जरोखे: कंपनीच्या जीवनकाळात या प्रकारच्या कर्जरोख्यांची परतफेड केली जात नाही. त्यांची परतफेड कंपनी विसर्जनानंतर अथवा एखाद्या अटीचा भंग केल्यास किंवा एखाद्या आकस्मिक घटनेनंतर केली जाते.
  7. परिवर्तनीय कर्जरोखे: एका ठरावीक कालावधीनंतर या कर्जरोख्यांचे समहक्क भागांमध्ये परिवर्तन होण्याचे अधिकार धारकास दिलेले असतात. तशी नोंद त्यांच्या कर्जरोखे प्रमाणपत्रावरच केलेली असते. या कर्जरोख्यांचे वाटप जनतेला करण्याआधी साधारण सभेमध्ये विशेष ठराव करणे गरजेचे असते. हे कर्जरोखेधारकांसाठी फायद्याचे असतात कारण या परिवर्तनाच्या हक्कामुळे या कर्जरोखे धारकांना बाजार मूल्यांपेक्षा कमी दराने समहक्क भाग मिळतात.
  8. अपरिवर्तनीय कर्जरोखे: या कर्जरोख्यांचे परिवर्तन समहक्क भागामध्ये केले जात नाही. या कर्जरोख्यांची परतफेड ठरावीक मुदत संपल्यानंतर केली जाते. या कर्जरोख्यांचा तोटा असा आहे की, यांच्या मूल्यांमध्ये वृद्धी होत नाही.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2025-2026 (March) Board Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×