Advertisements
Advertisements
Question
कोणत्या प्रकारचा पाऊस जगात सर्वाधिक भागांत पडतो? का?
Long Answer
Advertisements
Solution
- पर्वतरांगांच्या अडथळ्यामुळे पडणाऱ्या पावसाला प्रतिरोध पाऊस म्हणतात. जगातील सर्वाधिक प्रदेशात प्रतिरोध प्रकारचा पाऊस आढळतो.
- पृथ्वीचा सुमारे ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असल्यामुळे बाष्पयुक्त वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहून येण्याचे प्रमाण जगभर जास्त आहे. याउलट, आरोह वा आवर्त पावसाची परिस्थिती सर्वत्र व सतत आढळत नाही.
- पृथ्वीवर अनेक पर्वतरांगा व डोंगररांगा असल्यामुळे बाष्पयुक्त वार्यांना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हे वारे वरच्या दिशेने जातात, सांद्रीभवन होते आणि पाऊस पडतो. या प्रकारच्या पावसाचे क्षेत्र जगभर मोठ्या प्रमाणावर आढळते.
- याच्या तुलनेत, आरोह पाऊस केवळ विषुववृत्तीय भागात पडतो तर आवर्त पाऊस मुख्यतः समशीतोष्ण कटिबंधात आढळतो. थोडक्यात, प्रतिरोध पाऊस हा पृथ्वीवरील सर्वाधिक प्रमाणात आढळणारा पाऊस आहे.
shaalaa.com
पाऊस (पर्जन्य) आणि पावसाचे प्रकार
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

पुढील आकृती पहा व पावसाचा प्रकार अचूक ओळखा. असा पाऊस कोणत्या प्रदेशात पडतो ते लिहा.

आकृतींचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.



(अ) आकृती (ब) मध्ये डोंगराच्या कोणत्या बाजूस जास्त पाऊस पडत आहे.
(आ) आकृती (ब) मधील पर्जन्यछायेचा प्रदेश छायांकित करून त्यास नाव द्या.
(इ) (अ) व (क) आकृतींतील फरक कोणता?
(ई) वादळी वारे व पूर ही परिस्थिती कोणकोणत्या पावसाशी संबंंधित आहे?
(उ) सिंगापूरला यांपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडत असावा?
वेगळा घटक ओळखा.
पर्जन्यछायेच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कसे असते?
