English

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.

Short/Brief Note
Advertisements

Solution

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कोकण पट्ट्यात समृद्ध नैसर्गिकसंपत्ती आढळते. या प्रदेशात आंबा, काजू, फणस, कोकम यांसारखी अनेक महत्त्वाची फळे पिकतात. फळे ही नाशवंत असल्यामुळे त्यावर तातडीने प्रक्रिया करून त्यापासून उत्पादन मिळवणे आवश्यक असते. कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुबलक प्रमाणावर आंबा, काजू, फणस, कोकम या फळांचे उत्पादन होते आणि या उद्योगातून आंबा पेये, डबाबंद आंबारस, आटवलेला आंब्याचा रस, आंबावडी, आंबापोळी, फणसपोळी, फणसाचे तळलेले गरे, काजुगर, कोकम सरबत, आमसुले अशी विविध उत्पादने मिळवली जातात. त्यामुळेच कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.

shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: द्वितीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [Page 54]

APPEARS IN

Balbharati Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
Chapter 5 द्वितीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ३. ३) | Page 54
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×