Advertisements
Advertisements
Questions
खालील विधानाची सिद्धता लिहा.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान आकृतीसह स्पष्ट करा.
इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान स्पष्ट करा.
Advertisements
Solution 1
- पाऊस थांबल्यावर, वातावरणातील पाण्याच्या थेंबांमुळे सूर्यप्रकाशाचे अपवर्तन, अपस्करण, आंतरिक परावर्तन व पुन्हा अपवर्तन झाल्यामुळे आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
- सूर्यप्रकाश म्हणजे जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी व तांबडा अशा सात रंगांचे मिश्रण होय. पाऊस थांबल्यावर वातावरणात पाण्याचे असंख्य लहान थेंब असतात. सूर्यप्रकाश पाण्याच्या थेंबांवर पडला असता;
- हवेतून पाण्यात शिरताना प्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण होते.
- पाण्याच्या थेंबांमध्ये प्रकाशाचे आंतरिक परावर्तन होते.
- पाण्यातून हवेत शिरताना प्रकाशाचे अपवर्तन होते.

इंद्रधनुष्यनिर्मिती
- पाण्याचा अपवर्तनांक वेगवेगळ्या रंगांच्या प्रकाशासाठी वेगवेगळा असतो; जांभळ्या रंगासाठी तो सर्वांत जास्त, तर तांबड्या रंगासाठी तो सर्वांत कमी असतो. त्यामुळे हवेतून पाण्यात शिरताना प्रकाशाचे अपस्करण (वेगवेगळ्या रंगांमध्ये पृथक्करण) होते. (आकृती पाहा) या आकृतीत केवळ तांबडा व जांभळा हे दोनच रंग दाखवले आहेत. इतर पाच रंग या रंगांच्यादरम्यान असतात.
- वातावरणात पाण्याचे असंख्य थेंब असतात व ते छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात. त्यांच्या एकत्रित परिणामाने इंद्रधनुष्य तयार होते. यात तांबडा रंग बाहेरच्या बाजूला, तर जांभळा रंग आतल्या बाजूला असतो. इतर पाच रंग या रंगांच्यादरम्यान असतात.
इंद्रधनुष्य दिसण्यासाठी सूर्य निरीक्षकाच्या मागच्या बाजूला असला पाहिजे, तर पाण्याचे थेंब निरीक्षकाच्या पुढच्या बाजूला असले पाहिजेत.
Solution 2
- पाऊस पडून गेल्यानंतर आकाशात इंद्रधनुष्य दिसते.
- पाण्याचे अगदी लहान थेंब छोट्या लोलकाप्रमाणे कार्य करतात.
- जेव्हा वातावरणातील पाण्याच्या लहान थेंबामध्ये प्रकाशकिरण प्रवेश करतो तेव्हा पाण्याचे थेंब सूर्यप्रकाशाचे अपवर्तन व अपस्करण घडवून आणतात.
- नंतर थेंबाच्या आतमध्ये आंतरिक परावर्तन होते आणि शेवटी थेंबाबाहेर येताना त्याचे पुन्हा अपवर्तन होते.
- या सर्व नैसर्गिक घटनांचा एकत्रित परिणाम सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या स्वरूपात पाहावयास मिळतो.
Notes
Students should refer to the answer according to their question and preferred marks.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पदार्थ माध्यमात प्रकाशाचे आपल्या घटक रंगात पृथक्करण होण्याच्या प्रक्रियेस ______ म्हणतात.
शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता ______ रंग सर्वात कमी वळतो.
चूक की बरोबर ते लिहा.
तांबड्या किरणांची तरंगलांबी 700 nm च्या जवळ आहे.
खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा.

- आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे?
- सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता?
- सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता?
- वरील प्रक्रियेवर आधारित कोणतीही एक नैसर्गिक घटना लिहा.
- व्याख्या लिहा : वर्णपंक्ती.
