English

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा. भारत आणि रशिया

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानाचा सहसंबंध स्पष्ट करा.

भारत आणि रशिया

Explain
Advertisements

Solution

  1. सोव्हिएट रशियाबरोबरील संबंध हे शीतयुद्धकाळातील भारताचे सर्वाधिक टिकाऊ संबंध होते. भारताच्या सार्वजनिक क्षेत्रातील अवजड उद्योगांसाठी सोव्हिएट रशियाने तंत्रज्ञान आणि कमी व्याजदराचे कर्ज अशी मदत देऊ केली. भारताच्या संरक्षण दलांना महत्त्वाची शस्त्रास्त्रे पुरवली, तसेच यांपैकी काही शस्त्रास्त्रांचे भारतात उत्पादन करण्याचे करारही केले. या दोन देशांतील संबंधांमध्ये १९७१ चा भारत-सोव्हिएट मैत्री करार हा एक महत्त्वाचा टप्पा होता.
  2. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतरच्या सुरवातीच्या काही वर्षांमध्ये भारत आणि नव्याने निर्माण झालेला रशिया यांचे संबंध चांगले नव्हते. १९९० च्या दशकाच्या शेवटी ते सुधारायला लागले. सुखोई लढाऊ विमाने आणि ब्रम्होस क्षेपणास्त्रे यांच्या एकत्रित उत्पादनासाठी रशियाने भारताबरोबर करार केले.
  3. कुडनकुलम येथील अणुउर्जा प्रकल्पासाठी अणुभट्ट्या देण्याचेही त्याने मान्य केले. रशियाने आपली “ॲडमिरल गोर्शकॉव” नावाची विमानवाहू युद्धनौका भारताला विकत दिली, जी आज “आयएनएस विक्रमादित्य” या नावाने ओळखली जाते. रशियातून येणारी शस्त्रास्त्रे हा आजही दोन देशांतील संबंधांचा पाया आहे. त्याशिवाय रशियातील साखालीन - १ येथील तेलक्षेत्रात दोन्ही देशांची गुंतवणूक आहे, ज्यातून ऊर्जा सुरक्षेची गरज अधोरेखित होते.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×