Advertisements
Advertisements
Question
खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.
- अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
- अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)
Advertisements
Solution
(१) अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. -(उपमा अलंकार)
- ज्याची तुलना करायची ते (उपमेय) व ज्याच्याशी तुलना करायची ते (उपमान) यांच्यातील सारखेपणा चमत्कृतीपूर्ण रीतीने दाखविला जातो, तेव्हा उपमा अलंकार होतो.
- उपमेय - अब्दुल व उपमान - देवदूत यांच्यातील सारखेपणा येथे सुंदर रीतीने दर्शविला आहे.
- उपमा अलंकारामध्ये सारखेपणा दाखविण्यासाठी सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, सारखे, प्रमाणे, समतुल्य, गत, जेवी यांसारखी साम्यवाचक शब्द वापरले जातात.
- उदा.
(१) आभाळागत, माया तुझी आम्हावरी राहू दे ।
(२) सावळाच रंग तुझा पावसळि नभापरी
वरील दोन्ही उदाहरणामध्ये आभाळा एवढी माया आणि सावळाच रंग हा पावसळि नभासारखा अशी तुलना करून दाखवली आहे; अर्थातच एका शब्दाला दुसऱ्या शब्दासारखी उपमा दिलेली आहे म्हणून याला आपण उपमा अलंकार असे म्हणू .
(२) अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)
- उपमेय हे जणू काही अपमानच आहे अशी ज्यावेळी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अंलकार होतो.
- उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात.
- उदा.
(१) तिचे मुख जणू चंद्रच।
(२) त्याचे अक्षर जणू मोतीच.
वरील उदाहरणामध्ये (मुख-चंद्र, अक्षर- मोती) उपमेय हे जणू उपमानच आहे, असे जेथे वर्णिलेले आहे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
या दानाशी या दानाहुन
अन्य नसे उपमान
खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
न हा अधर, तोंडले नव्हत दांत हे कीं हिरे ।
खालील ओळीतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी!
खालील तक्ता पूर्ण करा.
| क्र. | उदाहरण |
सामान्य सिद्धांत |
विशेष गोष्टी |
|
(१) |
जन पळभर म्हणतिल, 'हाय हाय!' |
-- |
-- |
|
(२) |
सखेसोयरे डोळे पुसतिल, |
-- |
-- |
‘पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात.’
प्रस्तुत वाक्यातील अलंकार, उपमेय, उपमान ओळखा.
कृती पूर्ण करा.
कवितेतील ‘यमक’ अलंकार साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधा.
खालील वाक्यातील अलंकार ओळखा.
कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______
खालील कृती सोडवा.
आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________
(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______
खालील कृती सोडवा.
लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासि अंकुशाचा मार।
(१) संत तुकाराम महाराजांनी वरील अभंगात ज्या दोन गोष्टींची तुलना केली आहे त्या गोष्टी - ______ ______
(२) वरील उदाहरणातील अलंकार - ______
(३) या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______
खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.
सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।
| उपमेय | उपमान | अलंकाराचे नाव | अलंकाराची वैशिष्ट्ये |
खालील ओळीतील अलंकार ओळखा:
आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।
खाली दिलेल्या लक्षणांवरून अलंकार ओळखा:
उपमेय हे जणू उपमानच असते.
योग्य पर्याय निवडा:
दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा.
कुठे बुडाला पलीकडिल तो ‘सोन्याचा गोळा?’ - ................
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती - ................
खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव चौकटीत लिहा.
झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरी उडती!
हिरे, माणके, पाचू, फुटुनी पंखचि गरगरती! - ................
निशिगंधासारखा निशिगंधच होय.
वरील विधानाचे उद्गारार्थी वाक्य ओळखून लिहा:
मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी !
वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.
