Advertisements
Advertisements
Question
खालील तापमान-काल आलेख स्पष्ट करा.

Advertisements
Solution
बर्फ व पाणी यांच्या मिश्रणास सतत उष्णता दिल्यास काय : होते हे या तापमान-काल आलेखात दाखवले आहे.
या आलेखात रेख AB ही 0°C या स्थिर तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर होण्याची क्रिया दर्शवतो. या वेळी बर्फ उष्णतेचे शोषण करतो. ही क्रिया बर्फाचे पूर्णपणे पाण्यात रूपांतर होईपर्यंत चालू राहते.
बर्फाच्या सर्व तुकड्यांचे पाणी होईपर्यंत मिश्रणाचे तापमान 0°C असे स्थिर राहते. हे तापमान म्हणजे बर्फाचा वितळनांक होय. सर्व बर्फाचे पाणी झाल्यानंतर पाण्याचे तापमान 100°C पर्यंत वाढत जाते. या तापमानाला पाण्याचे रूपांतर वाफेत मोठ्या प्रमाणात होऊ लागते. सर्व पाण्याचे वाफेत रूपांतर होत असताना उष्णता ग्रहण केली जाते, पण तापमान स्थिर (100°C) राहते. हे तापमान म्हणजे पाण्याचा उत्कलनांक होय.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शीतपेयाची बाटली फ्रीजमधून काढून ठेवल्यास बाटलीच्या बाह्य पृष्ठभागावर पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. याचे स्पष्टीकरण दवबिंदूच्या साहाय्याने करा.
हवा संपृक्त आहे की असंपृक्त आहे हे कशाच्या आधारे व कसे ठरवाल?
हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण _____ या राशीच्या साहाय्याने मोजले जाते.
हवेतील बाष्पाचे संघनन होऊन ______.
सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त : हवा दमट :: सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा कमी : ______.
पहाटेच्या वेळी झाडाच्या पानांवर पाण्याचे थेंब जमा होतात हे कशाचे अस्तित्व दर्शवतात?
हवेत असणाऱ्या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून नसते.
दवबिंदू तापमानास सापेक्ष आर्द्रता 100% असते.
निरपेक्ष आर्द्रतेचे एकक kg/m3 हे आहे.
वातावरणाच्या खालील स्थितीत आपणास हवा कशी जाणवेल?
- जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त असेल.
- जर सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी असेल.
