English

खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा. भारतीय समाजातील विविध प्रकारचे हक्क जोपासण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्याही पाच आयोगांची माहिती द्या.

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा.

भारतीय समाजातील विविध प्रकारचे हक्क जोपासण्यासाठी स्थापन केलेल्या कोणत्याही पाच आयोगांची माहिती द्या.

Very Long Answer
Advertisements

Solution

शासनाने समाजातील विविध घटकांचे हक्क जपण्याच्या दृष्टीने खालील काही आयोगांची निर्मिती केली आहे:

  1. राष्ट्रीय अनुसूचित जातींसाठीचा आयोग: हा आयोग अनुसूचित जातींसाठीच्या संवैधानिक संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो, अनुसूचित जातींना अधिकारापासून वंचित ठेवले गेले असेल तर अशा प्रकरणांची चौकशी करतो.
  2. राष्ट्रीय अनुसूचित जमातींसाठीचा आयोग: हा आयोग संविधानाने हमी दिलेल्या संरक्षक उपाययोजनांच्या संदर्भात काम करतो, प्रामुख्याने अनुसूचित जमातींसाठीच अधिकार हिरावून घेतल्या गेलेल्या प्रकरणांची चौकशी करतो.
  3. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग: संविधानाने हमी दिलेल्या जीविताचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, समता आणि प्रतिष्ठेच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सदर आयोग काम करतो.
  4. राष्ट्रीय महिला आयोग: सदर आयोगाची स्थापना महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तसेच महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास चालना देण्यासाठी केली आहे.
  5. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग: देशभरात बालकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बालहक्कांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचा बचाव करणे यासाठी हा आयोग कार्यरत आहे. आयोगाच्या व्याख्येप्रमाणे ० ते १८ वयोगटांतील व्यक्तींना बालक समजले जाते.
  6. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग: हा आयोग सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणावर भर देतो.
  7. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग: अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी संसद आणि राज्यांच्या विधीमंडळांनी पारित केलेले कायदे आणि संविधानाने दिलेल्या संरक्षणविषयक तरतुदींच्या कार्यावर देखरेख करण्याचे काम हा आयोग करतो.
  8. राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोग: हा आयोग ग्राहकांच्या वादांचे निवारण करतो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×