Advertisements
Advertisements
Questions
भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक पुढील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर लिहा.
(अ) भौगोलिक घटक
(ब) ऐतिहासिक घटक
(क) आर्थिक घटक
(ड) राजकीय घटक
(इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट लिहा:
भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा.
(अ) भौगोलिक घटक
(ब) ऐतिहासिक घटक
(क) आर्थिक घटक
(ड) राजकीय घटक
(इ) आंतरराष्ट्रीय व्यवस्था
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा.
भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे कोणतेहो दोन घटक स्पष्ट करा.
Advertisements
Solution 1
(अ) भौगोलिक घटक: दक्षिण भारताची मोठी किनारपट्टी, तसेच उत्तर आणि ईशान्येकडील हिमालय पर्वताच्या रांगा यांनी भारताच्या परराष्ट्र आणि सुरक्षा धोरणाविषयीच्या टृष्टिकोनाला आकार दिला आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ संपूर्ण उत्तर आणि ईशान्य सीमेपलीकडे चीनसारखा मोठा देश असणे, याचाही परराष्ट्र धोरणावर परिणाम झाला आहे.
(ब) ऐतिहासिक घटक: यात शांतता आणि सहजीवनया भारताच्या पारंपरिक सांस्कृतिक मूल्यांचा समावेश होतो. पश्चिम, मध्य आणि आम्नेय आशियातील देशांबरोबरील ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंधांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर झालेल्या परिणामांचाही यात समावेश होतो. वसाहतवाद तसेच वर्णभेदाला विरोध यांसारखी मूल्ये ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान आखली गेली होती.
(क) आर्थिक घटक: अलिप्ततावादी धोरणाचा राजकीय, सामरिक, तसेच आर्थिक संदर्भही आहे. वासाहतिक काळापासून चालत आलेल्या गरिबी आणि मागासलेपणातून बाहेर येण्याची तीव्र गरज भारताला जाणवत होती. आर्थिक मदतीबरोबर जर अटी लादल्या जात असतील तर अशी मदत भारताने नाकारली आहे. आयात-पर्यायी धोरण आणि सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्वयांचा भारताच्या परराष्ट्र धोरणावर मोठा परिणाम झाला.
(ड) राजकीय घटक: भारताचे परराष्ट्र धोरण बनवण्यात आणि राबवण्यात शासनाचे कार्यकारी मंडळ महत्त्वाची भूमिका बजावते, तर संसद ‘जागल्या’ ची (watch dog) भूमिका बजावते. राजकीय नेतृत्वाचा परराष्ट्र धोरणावर मोठा प्रभाव असतो. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही.नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी या प्रधानमंत्र्यांनी भारताचे परराष्ट्र धोरण घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे.
(ई) आंतरराष्ट्रीय व्यवस्था: शीतयुद्धाच्या काळात द्विध्रुवीय व्यवस्था आणि महासत्तांचे राजकारण यांचा भारतीय परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला. शीतयुद्ध संपल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल घडले. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रमाणे क्षेत्रीय व्यवस्थेचाही भारताच्या परराष्ट्र धोरणावर प्रभाव पडला आहे.
Solution 2
- भौगोलिक घटक: भारताच्या विस्तीर्ण समुद्रकिनार्यामुळे आणि हिंदी महासागर व इंडो-पॅसिफिकमधील रणनीतिक स्थानामुळे समुद्री मार्गांचे रक्षण, समुद्री सुरक्षा आणि शेजारी राष्ट्रांसोबत सीमा व्यवस्थापन हे परराष्ट्र धोरणाचे प्राथमिक मुद्दे आहेत; हिमालयाजवळील सीमारेषा आणि चीन‑पाकिस्तानसारख्या शेजाऱ्यांचे वर्तनही धोरण ठरवताना निर्णायक ठरते.
- आर्थिक घटक: आंतरराष्ट्रीय व्यापार, परकीय गुंतवणूक, ऊर्जा‑आवश्यकता आणि बहुपक्षीय आर्थिक संस्थांमधील सहभाग यामुळे भारताचे धोरण व्यापार‑उन्मुख व आर्थिक सुरक्षितता लक्षात घेणारे बनते; त्यामुळे आर्थिक भागीदारी, मुक्त व्यापार करार व आर्थिक कूटनीतीला प्राधान्य दिले जाते.
Notes
Students should refer to the answer according to their question and preferred marks.
