Advertisements
Advertisements
Question
खालील प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे ८० ते १०० शब्दांत लिहा.
आघात पश्चात तणाव विकृतीचे स्वरूप स्पष्ट करा.
- अर्थ
- धक्का अवस्था (शॉक स्टेज)
- सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज)
- पुनर्प्राप्ती अवस्था (रिकव्हरी स्टेज)
Explain
Very Long Answer
Advertisements
Solution
- अर्थ: जर तणाव विकृतींची लक्षणे एक महिन्यापेक्षा जास्त आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्च्यात तणाव विकृतीचे (PTSD) निदान केले जाते. वरील उदाहरणातील विनेशला तीव्र तणाव विकृतीची लक्षणे एका महिन्यापेक्षा जास्त काळ सतत अनुभवायला आल्यास त्याला आघात पश्च्यात तणाव विकृतीचे निदान केले जातेही विकृती झाल्यानंतर व्यक्ती पुढील तीन अवस्थामधून जातो.
- धक्का अवस्था (शॉक स्टेज): या अवस्थेत व्यक्ती आघातामुळे अस्वस्थ झालेला असतो. त्याला काहीच सुचत नाही ती अघात अवस्थेत असते.
- सूचना अवस्था (सजेस्टिबल स्टेज): या अवस्थेत व्यक्ती आघाताच्या अवस्थेतून कसा बाहेर पडेल याची माहित इतरांकडून घेण्याचा प्रयत्न करतो. या अवस्थेत व्यक्ती संवेदनशील झाल्यामुळे कोणत्याही व्यक्तीने दिलेल्या सुचना स्वीकारून परिणामांचा विचार न करता वागू शकतो.
- पुनर्प्राप्ती अवस्था (रिकव्हरी स्टेज): या अवस्थेत व्यक्ती ताणाखाली असला तरी त्याचे मानसिक संतुलन निर्माण व्हायला लागते. घडलेल्या मानसिक आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. या काळात काही व्यक्तींना मानसिक समतोल राखता येत नाही परीणामी आघात पश्च्यात तणाव विकृती निर्माण (post traumatic stress disorder) होते.
shaalaa.com
प्रमुख मानसिक विकृती - आघात आणि ताणविषयक विकृती
Is there an error in this question or solution?
