English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 10th Standard

खालील ओळींचे रसग्रहण करा. ‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’ - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’

Short Answer
Advertisements

Solution

वारकरी संप्रदायातील थोर संतकवी संत नामदेवांनी ‘अंकिला मी दास तुझा’ या अभंगात आई-बाळ, पक्षीण-तिची पिल्ले, गाय-वासरू, हरिणी-तिचे पाडस अशा विविध उदाहरणांतून मातृप्रेमाचे वर्णन केले आहे.

आई आणि मुलाच्या नात्यातील प्रेमाची महती सांगताना संत नामदेव सांगतात की, आगीमध्ये जर एखादं बाळ सापडलं तर त्याची दयाळू आई अती व्याकूळ होऊन त्याला वाचवते. पक्षीण जरी आकाशात विहार करत असली तरी आपली पिल्ले जमिनीवर कोसळताच ती लगेच खाली झेप घेते. भुकेले वासरू जेव्हा हंबरू लागते तेव्हा गायही सारे काही सोडून हंबरत आपल्या वासराकडे धाव घेते. त्याचप्रमाणे जंगलाला वणवा लागला असेल आणि जर एखादया हरिणीचे पाडस त्यात सापडले तर ती हरिणी त्यास वाचवण्यास अती चिंतातूर होते.

अशाप्रकारे, संतकवी नामदेव परमेश्वर व स्वत:च्या नात्यातील प्रेमभाव पक्षीण व तिची पिल्ले, गाय व तिचे वासरू या उदाहरणांद्वारे स्पष्ट करत आहेत.

shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  Is there an error in this question or solution?
Chapter 2.1: संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव - कृती [Page 3]

APPEARS IN

Balbharati Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
Chapter 2.1 संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
कृती | Q (४)(अ) | Page 3

RELATED QUESTIONS

'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

माता धावून जाते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

गाय हंबरत धावते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

हरिणी चिंतित होत ______.


कोण ते लिहा.

परमेश्वराचे दास -


कोण ते लिहा.

मेघाला विनवणी करणारा -


आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.


पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 अ) आगीत पडणारे - ______ 

 ब) हुंबरत धावणारी - ______

अग्निमाजि पडे बाळू।

माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।

अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।

पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।

धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।

पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।

विनवितो चातक तैसा।।६।।

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. धरणी -

२. वन -

३. मेघ -

४. काजा -

४- काव्यसाैंदय

'तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।' या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -


खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'अंकिला मी दास तुझा'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू ।
माता धांवें कनवाळू।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला -
(ii) कनवाळू -
(iii) माझिया -
(iv) वणवा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता -
(ii) कनवाळू -
(iii) काज -
(iv) धेनू -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×